पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी कोलकाता इथं स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात लोककलाकारांसह नृत्य सादर केलं. कोविड १९ प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच हा सोहळा इतक्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. (Mamata Banerjee at Independence Day 2022 Event)
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमामध्ये काही डान्सर्ससोबत डान्स केला. त्यांनी पश्चिम बंगालच्या लोककलेचं सादरीकरण केलं. यावेळी परेडमध्ये तृणमूल सरकारच्या कनयश्री, लक्ष्मी भंडार, स्वास्थ साथी अशा लोकप्रिय कल्याणकारी योजना नृत्याच्या माध्यमातून सादर केल्या. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने राज्यभर सर्व प्रकारची तयारी केली आहे. संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
जिथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर महत्त्वाचे व्यक्ती उपस्थित होते, त्या रेड रोडवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या रस्त्यावर १,२०० पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. राज्यात सीमा सुरक्षा दल आणि बांग्लादेश सीमा रक्षकांच्या जवानांनी भारत बांग्लादेश सीमेवर मिठाई, शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.