...अन् ममता बॅनर्जींनी स्थानिक महिलेसोबत बनवले मोमोज, VIDEO

दार्जिलिंग दौऱ्यादरम्यान एका स्थानिक महिलेसोबत ममता बॅनर्जी मोमोज बनवताना दिसल्या.
cm mamata banerjee makes momos
cm mamata banerjee makes momosesakal
Updated on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आपल्या खास अंदाजामुळे आणि लोकप्रियतेमुळे नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांचा असाच हटके अंदाज हा सर्वांना पाहायला मिळाला आहे. दार्जिलिंग दौऱ्यादरम्यान एका स्थानिक महिलेसोबत ममता बॅनर्जी मोमोज बनवताना दिसल्या. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.(west bengal cm mamata banerjee makes momos)

cm mamata banerjee makes momos
पिटबुल कुत्र्याचा 80 वर्षाच्या मालकिणीवर जीवघेणा हल्ला; तासभर तोडत होता शरीराचे लचके

दार्जिलिंग येथील वानू भवनात जीटीएचा शपथविधी सुरू असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी फेरफटका मारण्यासाठी डोंगरी भागात गेल्या. यावेळी स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. दरम्यान, बचत गटातील महिलांशीही संवाद साधला. यावेळी त्यांची विचारपूस केली. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या ब्रेड आणि रोलिंग पिनसह मोमो बनवायला महिलेंसोबत बसल्या. बचत गटाच्या महिलांना मोमोज बनवण्यात मदत केली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.(mamata banerjee makes momos)

यापूर्वी, ममता यांनी रस्त्याच्या कडेला स्टॉल लावणाऱ्या काही दुकानदारांसोबत चर्चा केली. हे करत असतानाच ममता बॅनर्जींनी चक्क पाणीपुरी बनवून लहान मुलांना आणि तेथील पर्यटकांना खायला दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

cm mamata banerjee makes momos
नव्या असंसदीय शब्दांची यादी पाहून विरोधकांची टीका , "पुढे काय विश्वगुरु?"

नव्याने निवडून आलेल्या गोरखालॅण्ड टेरिटोरिअल अॅडमिनिस्ट्रेशनच्या सदस्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी ममता बॅनर्जी दार्जिलिंगला आल्या होत्या. २०१९ च्या दौऱ्यादरम्यान त्यांनी दिघा येथील रिसॉर्टवरील स्टॉलवर लोकांना मोमोज खाऊ घातलेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.