टीएमसी नेत्याच्या अडचणीत वाढ; अनुब्रता मंडल यांना 14 दिवसांची CBI कोठडी

अनुब्रता मंडल यांना सीबीआयनं बोलपूर येथून अटक केलीय.
Anubrata Mandal
Anubrata Mandalesakal
Updated on
Summary

अनुब्रता मंडल यांना सीबीआयनं बोलपूर येथून अटक केलीय.

पश्चिम बंगालमधील (West Bengal) गाय तस्करीचा (Cow Smuggling Case) आरोप असलेले टीएमसी नेते अनुब्रता मंडल (Anubrata Mandal) यांना आज (बुधवार) आसनसोल येथील विशेष सीबीआय न्यायालयात (Asansol CBI Court) हजर करण्यात आलं. विशेष सीबीआय न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावलीय. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

अनुब्रता मंडल यांना सीबीआयनं बोलपूर येथून अटक केलीय. गेल्या 14 दिवसांपासून ते सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यांच्या सीबीआय कोठडीची मुदत आज संपली. कोलकातामधील (Kolkata) सीबीआय मुख्यालय असलेल्या निजाम पॅलेसमधून त्यांना आसनसोल इथं आणण्यात आलं आणि विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय की, 'गरज भासल्यास सीबीआय तुरुंगात कोठडीदरम्यान त्यांची चौकशी करू शकतं.'

Anubrata Mandal
मोठी बातमी : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीला अटक होण्याची शक्यता!

न्यायालयात अनुब्रता मंडल यांच्या वकिलांनी सांगितलं की, 'तपासादरम्यान काहीही आढळलं नाही. ही संपूर्ण मीडिया ट्रायल आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्ष आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हा प्रकार करत आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. गायीची तस्करी ही बीरभूमची नसून मुर्शिदाबादमधून होते आणि सीमेवर बीएसएफ तैनात आहे. त्यांचा या तस्कराशी कोणताही संबंध नाही.'

Anubrata Mandal
पक्ष सोडल्यास 20 कोटी, दुसरा नेता सोबत आणल्यास 25 कोटी; आप खासदाराचा गौप्यस्फोट

दुसरीकडं सीबीआयच्या वकिलांनी सांगितलं की, गायी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं हा गुन्हा नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र, सीमेपलीकडून गायींची तस्करी होते. यामध्ये बीएसएफचे काही लोकही सहभागी झाले होते. त्यांना अटक करण्यात आलीय. गाय तस्कर इनामुल हक हा या मंडळातील एक प्रमुख आहे. अनुब्रता मंडल यांचा अंगरक्षक सहगल हुसेन त्याच्याकडून पैसे घेत होता. ते पैसे अनुब्रत मंडलपर्यंत पोहोचायचा. गायींची तस्करी हा राष्ट्रीय स्तरावरील गुन्हा आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.