CV Bose : राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर श्‍वेतपत्रिका काढा; सी.व्ही.आनंद बोस यांची राज्य सरकारला सूचना

‘पश्‍चिम बंगालची आर्थिक स्थिती ही अनेक जोखिमींना तोंड देत आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापनही कोलमडले असून त्यातील अनेक त्रुटी उघडकीस येत आहेत.
cv bose and mamata banerjee
cv bose and mamata banerjeesakal
Updated on

कोलकता - पश्‍चिम बंगाल राज्य मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असून याबाबत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी श्‍वेतपत्रिका मांडावी असे, पश्‍चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी सरकारला ममता सरकारला सांगितले आहे. बोस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची शनिवारी भेट घेतली, त्याच दिवशी त्यांनी त्यांनी श्‍वेतपत्रिका काढण्याबाबत सरकारला सांगितले.

‘पश्‍चिम बंगालची आर्थिक स्थिती ही अनेक जोखिमींना तोंड देत आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापनही कोलमडले असून त्यातील अनेक त्रुटी उघडकीस येत आहेत. ही स्थिती अत्यंत अस्वस्थ करणारी आणि धक्कादायक आहे.

पश्‍चिम बंगाल आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचे पाहून मन उद्विग्न होत आहे, सार्वजनिक कामांसाठीच्या निधींचे वितरण करणारी व्यवस्था पार कोलमडली आहे,’ असे राजभवनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राज्याच्या आर्थिक परिस्थितीची गंभीर अवस्था पाहता, घटनेतील कलम १६६ मधील नियम ३० चा संदर्भ घेत १७६ नुसार राज्यपालांना मिळालेल्या अधिकाराच्या आधारे राज्यपाल मुख्यमंत्र्यांना राज्यातील आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यास आणि याबाबत श्‍वेतपत्रिका काढण्यास सांगत आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

‘मत्स्यपालन’साठी विकास आराखडा

मत्स्यपालन व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी आर्थिक उत्पन्न वाढविणाऱ्या योजना राबविण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रतिपादन बोस यांनी अर्थमंत्र्यांशी बोलताना केले असल्याचे राजभवनाच्या वतीने सांगण्यात आले. बोस यांनी मत्स्यपालन क्षेत्राच्या विकासाचा विस्तृत आराखडा देखील सीतारामन यांच्याकडे सोपविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.