एका चुकीमुळे बंगालमध्ये डावे शिखरावरुन शून्यावर आले?

cpim
cpim file photo
Updated on

नवी दिल्ली- दशकापूर्वी घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा तोटा पश्चिम बंगालमधील (west bengal) माकपला (CPI-M) आज बसत आहे. कधीकाळी सत्तेच्या शिखरावर असणाऱ्या माकपला आज राज्यात भोपळाही फोडता आलेला नाही. ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाशी शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती आहे, की डाव्या पक्षाला विधानसभेत कोणतेही प्रतिनिधित्व नाही. डाव्या पक्षामधील अनेक नेते मान्य करतात की, सिंगूर भूमि अधिग्रहणाचा निर्णय, त्यांच्या राजकीय पतनाचा कारण बनला. त्यानंतर पक्षाला पुन्हा उभे राहण्याची संधी मिळाली नाही. (west bengal election result 2021 left CPIM won zero seats)

माकपने २००६ मध्ये राज्यात १७६ जागा जिंकल्या होत्या आणि बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री बनले होते. पण, त्यांच्या कार्यकाळात सिंगूरमध्ये टाटा मोटर्सला शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहन करु देण्याच्या निर्णयाने तृणमूल काँग्रेसने राज्यात आपला पाया मजूबत केला. हे प्रकरण तृणमूल काँग्रेसने लावून धरले. परिणाम असा झाला की, २०११ मध्ये माकपच्या ३४ वर्षांच्या शासनकाळाचा अंत झाला. तरीही माकपला ३० टक्के मतं आणि ४० जागा मिळाल्या होत्या. २०१६ मध्ये मतांच्या टक्केवारीत आणखी घट झाली, माकपला १९.७५ टक्के मतं आणि २६ जागा मिळाल्या. त्यावेळी माकपने काँग्रेससोबत आघाडी करुन निवडणूक लढवली होती.

cpim
पश्चिम बंगाल : बॉम्बस्फोटात भाजपचे 6 कार्यकर्ते जखमी

२०२१ च्या निवडणुकीत माकपने काँग्रेससोबत आघाडी केली होती. ममता विरोधी कट्टर मुस्लीम संघटना आयएसएफसोबत हात मिळवला, त्यामुळे डाव्यांवर टीका झाली. माकपच्या या प्रयत्नानंतरही हाती काही लागलं नाही. माकपला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही आणि मतांची टक्केवारी घटून ४.७ टक्के झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि आयएसएफलाही एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसला तीन टक्के, तर आयएसएफला एक टक्के जागा मिळाल्या.

cpim
कोरोनाबाबत जनजागृतीचा हटके प्रकार; केरळ पोलिसांचा VIDEO व्हायरल

माकपकडून काय चुका झाल्या?

माकप सत्तेतून जाण्यामागे सिंगूर प्रकरण प्रमुख असले तरी, त्यानंतर पक्ष पुन्हा न उभा राहण्यामागे अनेक कारणे आहेत. ज्या मुद्द्यावरुन माकप राजकारण करत होती, तेच मुद्दे आता ममता बॅनर्जी यांनी आत्मसात केले आहेत. ममता राज्यात एक मजबूत मुख्यमंत्री म्हणून समोर आल्या आहेत, तर माकपला कोणताही चेहरा देता आलेला नाही. ३४ वर्षाच्या शासन काळात माकप ज्या विरोधी पक्षासोबत लढत होती, त्याच काँग्रेससोबत हातमिळवणी केली. भाजपने राज्यात जेव्हा जोर लावण्यास सुरुवात केली, तेव्हा माकप संभ्रमात होती की, त्यांना भाजपविरोधात लढायचंय की तृणमूलविरोधात. यासर्व कारणांमुळे माकपवर आज राज्यात शुन्यावर येण्याची वेळ आलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.