Bill Passed: बलात्कारातल्या आरोपींना होणार फाशी, २१ दिवसांमध्ये तपास पूर्ण करावा लागणार; विधेयक मंजूर

mass protests on streets of Kolkata incident of doctor assault and killing crime
mass protests on streets of Kolkata incident of doctor assault and killing crimeSakal
Updated on

West Bangol: पश्चिम बंगालमध्ये एक ऐतिहासिक विधेयक राज्य सरकारने मंजूर केलं आहे. या विधेयकातील तरतुदीनुसार बलात्कार प्रकरणाचा तपास २१ दिवसांमध्ये पूर्ण करायचा आहे आणि आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद विधेयकामध्ये आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जी सरकारने बलात्कारविरोधी विधेयक विधानसभेत मांडलं होतं. हे विधेयक मंजूर झालं असून भाजपनेही विधेयकाला समर्थन दिलं. बलात्काराच्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे.

बलात्कार प्रकरणाचा तपास २१ दिवसांत पूर्ण व्हावा, असं या विधेयकात प्रावधान आहे. सरकारने या विधेयकाला अपराजिता महिला विधेयक (पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा आणि सुधारणा) २०२४ असं नाव दिलं आहे.

विधेयक मंजूर करण्यासाठी सोमवारपासून विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. 'ममता बॅनर्जींच्या या विधेयकाला आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे' असं भाजप नेत्या सुकांता मजुमदार यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळं हे विधेयक बहुमताने सभागृहात मंजूर झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.