बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) आणि ममता सरकारमधील (Mamata Banerjee) वाद आता शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, राज्यपाल जगदीप धनखर यांनी पश्चिम बंगाल विधानसभेचे अधिवेशन (अधिवेशन) अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा आदेश जारी केला आहे. स्वतः राज्यपालांनी ट्विटरवर हा आदेश शेअर करून ही माहिती दिली आहे. राज्य सरकार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत होते त्याच दरम्यान राज्यपालांनी हे पाऊल उचलल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता राज्यपालांच्या परवानगीशिवाय विधानसभेचे अधिवेशन बोलवता येणार नाही.
राज्यपालांनी या आदेशाविषयी ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटलय की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १७४ अन्वये राज्य विधानसभेचे अधिवेशन (संसद किंवा इतर विधानसभेचे अधिवेशन विसर्जित न करता) १२ फेब्रुवारी २०२२ पासून अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
राज्यपालांनी हे पाऊल उचलल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यपाल आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात विविध मुद्द्यांवरून सतत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांवर गंभीर आरोप करत त्यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले आहे. ममता सरकार कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासह असंविधानिक काम करत असल्याचा आरोप राज्यपाल सातत्याने करत आहेत.राज्यपालांच्या या निर्णयावर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत याला घटनाबाह्य ठरवले आहे. तर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ खासदार सौगता रॉय यांनी राज्यपालांच्या आदेशाला राज्य सरकार न्यायालयात आव्हान देणार असल्याचे संकेत दिले आहे..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.