पश्चिम बंगालवर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) ममता बॅनर्जी यांचे गेल्या तीन निवडणुकांपासूनचे वर्चस्व यंदाही कायम राहिले आहे. तेथील राजकीय पटलावर राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार कायम परिघाबाहेर राहिले आहेत. धर्मावर आधारित राजकारणाचा भाजपचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.
बंगालमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस हा सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरला होता. मात्र २०१४ पेक्षा त्यांच्या जागा ३० ने कमी झाल्या होत्या तर भाजपचे संख्याबळ दोनवरून एकदम १८ वर पोहोचले होते. यंदाच्या निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमुळे प.बंगालचे नाव देशभरात चर्चेत होते.
‘इंडिया’ आघाडीचा भाग असूनही ममता बॅनर्जी यांनी लोकसभेच्या सर्व ४२ जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. यामुळे निवडणुकीत चुरस वाढली होती. यापैकी २९ जागा जिंकून ममतादीदींनी त्यांचा करिष्मा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला एका जागांवर समाधान मानावे लागले.
मतमोजणीच्या तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत सकाळी पावणेबारापर्यंत ‘तृणमूल’चे ३२ आघाडीवर राहून कल दाखवून दिला. तेथे पक्षाचे कीर्ती आझाद यांच्यापेक्षा भाजपचे वरिष्ठ नेते दिलीप घोष हे खूप मागे होते. सर्वांत मोठा निकाल हा संदेशखाली ज्या लोकसभा मतदारसंघात येत्या बशीरहाटमधील आहे.
तेथे ‘तृणमूल’चे नेते शाहजहाँ शेख यांच्याविरोधात भाजपच्या उमेदवार रेखा पात्रा यांनी लैंगिक अत्याचार आणि जमीन हडपण्याचा आरोप केला होता. यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. शेख यांना अटकही झाली होती. हा मुद्दा भाजपने निवडणूक प्रचारात प्रतिष्ठेचा केला होता. पण त्यांचे सर्व दावे खोटे ठरवित ‘तृणमूल’चे उमेदवार हाजी नुरूल इस्लाम यांनी बाजी मारली आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाने डायमंड हार्बर मतदारसंघ यंदाही राखला आहे. तेथे ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी गेल्या वेळचा विक्रम मोडला आहे. त्यांनी सहा लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्यांनी विजय मिळविला आहे. बहरामपूरमध्ये माजी क्रिकेटपटू व ‘तृणमूल’चे उमेदवार युसूफ पठाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीररंजन चौधरी यांना तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.
वर्धमान-दुर्गापूरमधून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी पराभव केला आहे. प्रश्नांच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपावरून लोकसभेतून निलंबित केलेल्या महुआ मोईत्रा यांनी कृष्णनगरमधून भाजपच्या अमृता राय यांना विजय मिळविला आहे. मालदा दक्षिण हा एकमेव लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आला आहे. तेथून ईशा खान चौधरी या जिंकल्या आहेत.
‘तृणमूल’साठी लाभदायक
राज्यातील अल्पसंख्याक समुदाय यंदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसच्या बाजूने उभा राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पण तसे काही झाले नाही. तसेच पूर्णिया, बांकुर आणि झागराम येथील हिंदू मतदारांनी ममता बॅनर्जी यांना हात दिला. मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेल्या महिलांचाही कलही ‘तृणमूल’कडे राहिला.
शंभर दिवसांच्या कामासाठीचा बंगालचा निधी केंद्राने राखून ठेवल्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. भाजपच्या कोणत्याही नेत्याने कोणत्याही बैठकीत नेत्याने त्याचे स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे गरिबांमधील निराशा मतपेटीतून उमटली. भाजपची सत्ता पुन्हा आल्यास बंगालमधील लक्ष्मी भंडार या योजनेचा विस्तार करण्याचे अमित शहा यांनी दिलेल्या आश्वासनाचा लाभ ‘तृणमूल’ला मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.