ओडिशाला 600, बंगालला 400 कोटी मदत; राज्यांसोबत भेदभाव!

modi and mamta
modi and mamta
Updated on
Summary

चक्रीवादळ यासचा सामना करण्यासाठी राज्याला केल्या जाणाऱ्या मदतीत केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय.

कोलकाता- चक्रीवादळ यासचा सामना करण्यासाठी राज्याला केल्या जाणाऱ्या मदतीत केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय. पश्चिम बंगालसोबत भेदभाव केला गेला असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. ममतांनी सांगितलं की, गृहमंत्रालयाने ओडिशा आणि आंध्र प्रदेशला मदत कार्यासाठी 600 कोटी रुपयांची मदत केली आहे, तर पश्चिम बंगालला फक्त 400 कोटींची मदत केली आहे.

केंद्र सरकारने भेदभाव केल्याचं सांगतानाच ममतांनी राज्य करत असलेल्या तयारीचीही माहिती दिली. राज्यात 4 हजार सायक्लोन शेल्टर्स तयार करण्यात आलेत, 10 लाख लोकांचे स्थलांतर केले गेले आहे. 51 डिजास्टर मॅनेजमेंट टीम, 1000 इलेक्ट्रिसिटी आणि 400 मोबाईल नेटवर्क सुरक्षा टीम तयार करण्यात आली आहे. यात 20 जिल्हे जास्त प्रभावीत होण्याची शक्यता असल्याचं ममता म्हणाल्या आहेत.

modi and mamta
Yaas चक्रीवादळ पुढच्या 24 तासात बंगालला धडकणार

पूर्व-मध्येकडील बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे यास चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. ते उत्तर-वायव्य दिशेने हळूहळू सरकत असून पुढील २४ तासांत हे वादळ तीव्र ते त्यापुढील २४ तासांत ते अधिक तीव्र होणार असल्याचे भुवनेश्‍वर हवामान विभागाचे संचालक एच. आर. विश्‍वास यांनी सांगितले. ओडिशा व पश्‍चिम बंगालच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील पारादीप ते सागर बेटांवर बुधवारी दुपारी चक्रीवादळाचे रूपांतर अति तीव्र होणार आहे.

दरम्यान, यास चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर बुधवारी (ता. २६) सकाळी धडकणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने राज्य सरकारने दहा जिल्ह्यांमधील लॉकडाउन सोमवारपासून दोन दिवसांसाठी शिथिल केला आहे. किनारपट्टीवरील पारादीप शहरात पाऊस पडला. काही भागातून नागरिकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. वादळ ओडिशाला धडकण्यापूर्वी लोकांना अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली असून दहा जिल्ह्यांमध्ये दुकांनाची वेळ सकाळी सात ते एक अशी करण्यात आली आहे, असे मुख्य सचिव सुरेशचंद्र मोहपात्रा यांनी अधिसूचनेत म्हटले आहे.

modi and mamta
फायझर-मॉडर्नाचा राज्यांशी करारास नकार; व्यवहार केवळ केंद्राशी

केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला आढावा

चक्रीवादळाला सामारे जाण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटानाईक यांनी घेतला. वादळाच्या काळात राज्यातील सर्व कोरोना रुग्णालये, प्रयोगशाळा, लसीकरण शीतगृहे आणि अन्य वैद्यकीय केंद्रांमध्ये पुरेशा वीज पुरवठ्यासाठी यंत्रणा तयार ठेवण्याची खास निर्देश शहा यांनी दिले. या दोन्ही नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २३) तयारीच्या आढाव्यासाठी उच्चस्तरिय बैठक घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.