सध्या बंगालमध्ये निवडणुका झाल्या असल्या, तरी इथलं राजकीय वातावरण अजूनही तापलेलं दिसत आहे.
सध्या पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) निवडणुका झाल्या असल्या, तरी इथलं राजकीय वातावरण अजूनही तापलेलं दिसत आहे. बंगालात तृणमूलनं (Trinamool Congress Party) बाजी मारलीय तर भाजपचा इथं मोठा पराभव झालाय. मात्र, राज्यात भाजप मजबूत करण्यासाठी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. मात्र, अशातच आता भाजप नेते आणि नंदीग्रामचे आमदार सुवेंदू अधिकारी (MLA Suvendu Adhikari) यांनी जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप (WhatsApp Group) सोडलाय. सोमवारी पक्षानं पाच मंडल अध्यक्षांची नावं दिल्यानंतर लगेचच ते ग्रुपमधून लेफ्ट झाले आहेत.
भाजपचे (BJP) मोयनाचे आमदार अशोक दिंडा यांनी ग्रुप सोडला होता, तशीच हालचाल सुवेंदू अधिकारी यांनी केलीय. बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार म्हणाले, अधिकारी यांनी त्यांना सांगितलं होतं की ते राज्य स्तरावर काम करत असताना त्यांना जिल्हा संघटनेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सक्रीय व्हायचं नाहीय. भाजप तमलूक संघटनेचे उपाध्यक्ष व अधिकारी निष्ठावंत साहेब दास यांनीही ग्रुपला सोडचिठ्ठी दिलीय. मात्र, दास यांनी यावर खुलासा दिलाय. रविवारी संध्याकाळी एका पार्टी कार्यक्रमात आपला सेलफोन हरवला असल्याचं त्यांनी सांगितलंय.
दरम्यान, मजुमदार यांनी रविवारी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी त्यांच्यावर केलेल्या ‘अनुभव शुन्य’ असल्याच्या आरोपावर मौन सोडलं होतं. ‘मला बंगाल भाजपचे अध्यक्ष बनवताना खासदार म्हणून अडीच वर्षांचा अनुभव होता. बंगाल भाजपचे अध्यक्ष झाल्यावर घोष यांना फक्त सहा महिन्यांचा अनुभव होता,’ असा टोला मजुमदार यांनी हाणला होता. त्यामुळं भाजपमधील अंतर्गत कलह देखील आता समोर येऊ लागलाय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.