'या' राज्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या 'मान्सून' कुठं पर्यंत पोहोचला

Monsoon Updates | Rain Updates in Maharashtra
Monsoon Updates | Rain Updates in Maharashtraesakal
Updated on
Summary

कडक उन्हामुळं होरपळणारी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत आहे.

नवी दिल्ली : कडक उन्हामुळं होरपळणाऱ्या दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील जनता मान्सूनच्या (Monsoon) आगमनाची आतुरतेनं वाट पाहत आहे. हवामान खात्यानं (Weather Department) मान्सूनच्या आगमनाबाबत नवीन अपडेट जारी केलंय. राजधानी दिल्लीत आज 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज बुधवार, 15 ते 20 जूनपर्यंत दररोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवलीय. (Rain Updates in Maharashtra)

'या' राज्यांत आज मुसळधार

स्कायमेटच्या हवामानानुसार, आज ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, विदर्भ, तेलंगणा, मराठवाडा (Marathwada), तामिळनाडू आणि केरळमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अंदमान-निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्र (Maharashtra), कोकण, गोवा, पश्चिम हिमालय, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Monsoon Updates | Rain Updates in Maharashtra
Presidential Election : विरोधी पक्षांकडून शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न

तीन दिवसांत मान्सून दाखल होणार

उत्तर-पश्चिम बंगालचा उपसागर, ओडिशाचा काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, संपूर्ण उप-हिमालयीन प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात 2-3 दिवसांत मान्सून प्रवेश करु शकतो. तर दुसरीकडं दिल्ली, हरियाणा, पंजाब, पश्चिम यूपीमध्ये 25 जूनपर्यंत मान्सून पोहोचू शकतो. मात्र, वातावरणातील बदलामुळं 16-17 जून रोजी पावसाची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()