Lok Sabha Elections: मतदान केंद्राबाहेर दंगा! भाजप उमेदवाराशी भिडला तृणमूलचा नेता; पाहा व्हिडिओ

Lok Sabha Elections : भाजपचे उमेदवार आणि तृणमूल काँग्रेसचे बुथ अध्यक्ष हे भिडल्याचं पाहायला मिळालं.
West Bengal
West Bengal
Updated on

Lok Sabha Elections- देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक लोक मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. मतदान सुरु असले तरी राजकीय नेत्यांमधील वैर अद्याप संपष्टात आलेलं नाही. याचच चित्र पश्चिम बंगालच्या मुरशीदाबादमध्ये पाहायला मिळाले. याठिकाणी भाजपचे उमेदवार आणि तृणमूल काँग्रेसचे बुथ अध्यक्ष हे भिडल्याचं पाहायला मिळालं.

जंगीपूर मतदान केंद्राबाहेर हा प्रकार पाहायला मिळाला आहे. भाजप उमेदवार मतदान करुन बाहेर पडल्यानंतर त्यांची तृणमूल काँग्रेसच्या नेत्यासोबत बाचाबाची सुरु झाली. यावेळी भाजपचे उमेदवार धनंजय घोष यांनी तृणमूलच्या नेत्याला धक्काबुक्की केल्याचं देखील पाहायला मिळतंय. एएनआयने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.

West Bengal
Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी
West Bengal
Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

सदर घटना घडली त्यावेळी सुरक्षा दलाचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा देखील उपस्थित होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने दोन्ही नेत्यांमधील वाद सोडवण्यात आला. पोलीस आणि सुरक्षा दलाने मध्यस्थी केली नसती तर हे भांडण वाढण्याची शक्यता होती. मात्र, मतदानाच्या दिवशीच हा वाद निर्माण झाल्याने टीएमसी आणि भाजपमधील राज्यातील वैर किती टोकाचं आहे हे समोर आलं आहे.

भाजपचे मुरशीदाबादचे उमेदवार धनंजय घोष यांनी सदर घटनेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. मी भाजपचा उमेदवार आहे आणि मला तृणमूल काँग्रेसच्या बुथ अध्यक्षाने धमकावलं आहे. एका उमेदवाराला असं धमकावलं जात असेल तर सामान्य लोकांची काय स्थिती असेल. आम्ही याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असं घोष म्हणाले आहेत. ते एएनआयशी बोलत होते.

West Bengal
Dindori Lok Sabha Election 2024 : 'मविआ'ला मोठा दिलासा! दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपची उमेदवारी मागे

दरम्यान, देशात आज तिसऱ्या टप्प्यामध्ये ९३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होत आहे. महाराष्ट्रात देखील ११ मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेढीत बंद होणार आहे. ४ जून रोजी निकाल स्पष्ट होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.