कोलकाता- पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भर रस्त्यात लोकांच्या उपस्थितीत महिला आणि पुरुषाला मारहाण करत आहे. भाजपचे नेते अमित मालविया यांनी यासंदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मारहाण करणारा व्यक्ती तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता ताजमुल हक्क उर्फ जेसीबी असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यानेच जोडप्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.
जेसीबी हा उत्तर दिनाजपूरमधील चोपरा भागातील स्थानिक गुंड आहे. त्याने महिलेला भर रस्त्यात केलेली मारहाण अनेक लोक पाहात होते. काहीजण या मारहाणीला समर्थन देखील देत होते. हा संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक आणि राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महिलांच्या सुरक्षेवरून भाजप आणि सीपीआय ( एम) ने तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे.
व्हिडिओमध्ये दिसतंय की, व्यक्ती महिला आणि पुरुषाला काठीने बेदम मारत आहे. महिला वेदनेने किंचाळते पण याचा कोणावरही परिणाम होत नाही. उलट जमाव या व्यक्तीचे समर्थन करतो. महिलेच्या केसाला धरून तिला ओढलं देखील जातं. पुरुष आणि महिला दोघे मारहाणीमुळे बेशुद्ध झाल्याचं दिसत आहे. मारहाण करणारा व्यक्ती ताजमल हक्क उर्फ जेसीबी असल्याचं कळतंय. जेसीबीचा परिसरात दबदबा आहे, म्हणूनच त्याला जेसीबी म्हटलं जातं.
मिळालेल्या माहितीनुसार, जोडपे एकमेकांवर प्रेम करत होते. अनधिकृत शरिया कोर्टाच्या निर्णायानुसार त्यांना शिक्षा देण्यात आली होती. त्यामुळे जेसीबी जोडप्याला मारहाण करत होता. याप्रकरणी महिला किंवा पुरुषाने तक्रार दाखल केलेली नाही. पण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर जेसीबी फरार होता. पण, पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.