Electoral Bonds Explained : इलेक्टोरल बॉन्ड नेमकं असतात काय, यावरून वाद का सुरू आहे?

देशात आज पासून इलेक्टोरल बॉण्ड्स च्या विक्रीला सुरुवात होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील २९ शाखांमध्ये आजपासून ११ जानेवारी पर्यंत इलेक्ट्रॉरल बॉण्ड्सची विक्री सुरू राहणार आहे.
What are electoral bonds who can buy them Political parties Interest supreme court explained marathi news
What are electoral bonds who can buy them Political parties Interest supreme court explained marathi news
Updated on

नवी दिल्ली : देशात आज पासून इलेक्टोरल बॉण्ड्स च्या विक्रीला सुरुवात होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील २९ शाखांमध्ये आजपासून ११ जानेवारी पर्यंत इलेक्ट्रॉरल बॉण्ड्सची विक्री सुरू राहणार आहे. दरम्यान राजकीय पक्षांच्या उत्पन्नात महत्वाची भूमिका असणारे हे इलेक्टोरल बॉन्ड नेमकं असतात काय? आणि यावरून सध्या जो वाद सुरू आहे तो काय आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

इलेक्टोरल बॉन्ड नक्की काय आहे?

इलेक्टोरल बॉन्ड अशी एक व्यवस्था ज्याच्या माध्यमातून राजकीय पक्ष निधी स्वीकारतात. तसेच या इलेक्ट्रॉल बॉन्डला व्याज नसते. तसेच हे इलेक्टोरल बॉन्ड देशातील सार्वजनिक बॅंकामधून विकत घ्यावे लागतात. वर्षातून एका विशिष्ट कालावधीमध्ये हे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले जातात.

देशातील सामान्य नागरिक किंवा कंपन्या हे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करून राजकीय पक्षांना देणगी देतात. एक हजार रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंतचे इलेक्टोरल बॉन्डस काढता येतात.

What are electoral bonds who can buy them Political parties Interest supreme court explained marathi news
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील 'या' राज्यात थंडीची लाट वाढणार; हवामान खात्याचा पावसाचाही इशारा

इलेक्टोरल बॉन्ड कोणत्या पक्षाला मिळू शकतात?

निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आणि सार्वत्रिक निवडणुकीत कमीत कमी १ टक्के मत मिळवलेले राजकीय पक्ष निवडणूक रोख्यांच्या योजनेसाठी पात्र ठरतातय

ज्या पक्षाला लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान एक टक्का मतं मिळाली आहेत अशा पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड मिळू शकतात.

दरम्यान इलेक्टोरल बॉन्ड हा विषय मागील काही दिवसांपासून वादात आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. तसेच न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

What are electoral bonds who can buy them Political parties Interest supreme court explained marathi news
Ayodhya Ram Mandir: कोण आहेत शिल्पकार अरुण योगीराज, ज्यांनी घडवलेली मूर्ती अयोध्येतील मंदिरात होणार विराजमान?

याचिकाकर्त्यांचा आक्षेप काय?

बॉन्ड कोण खरेदी करत आहे आणि कोणाला देणगी स्वरूपात देतो याचं कोणतंही रेकॉर्ड सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध नाही. जेव्हा एखादी कंपनी किंवा व्यक्ती इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करते तेव्हा त्याची माहिती संबंधित बॅकेकडे असते. सत्तेत असलेला पक्ष या संदर्भातील माहिती सहज मिळवून शकतो. तसेच सत्ताधारी राजकीय पक्ष संबंधितांवर प्रभाव टाकू शकतो.

इलेक्ट्रोल बॉण्ड च्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीचे मूळ कळत नाही, त्यामुळं या बॉन्डच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने ही याचिका दाखल केली होती. आता याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

What are electoral bonds who can buy them Political parties Interest supreme court explained marathi news
Electoral Bond: भाजप असो की आप-काँग्रेस, प्रत्येकाच्या खजिन्याची चावी असणारं काय आहे इलेक्टोरल बाँड?

विक्री कुठे आणि कशी होणार?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील २९ शाखांमध्ये आजपासून ११ जानेवारी पर्यंत इलेक्ट्रॉरल बॉण्ड्सची विक्री सुरू राहाणार आहे. तसेच मुंबईतील हॉर्नीमन सर्कल येथील SBI च्या शाखेत निवडणूक रोख्यांची विक्री होईल. मात्र खरेदी केल्यानंतर १५ दिवसच हे इलेक्टोरल बॉण्ड्स वैध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.