Video: प्रशांत किशोर यांच्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांनी बिहारींना...खान सरांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Khan sir on Prashant Kishore :आपल्या शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे खान सर प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
Video: प्रशांत किशोर यांच्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांनी बिहारींना...खान सरांचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Updated on

नवी दिल्ली- आपल्या शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे खान सर प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खान सर यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि बिहारी लोकांबाबत भाष्य केलं आहे. जन्म स्थानावरून कोणासोबत भेदभाव झाला असेल तर तो दोघांसोबत झाला आहे, असं ते व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

पूर्वोत्तरच्या लोकांसोबत आणि बिहारी लोकांसोबत भेदभाव झाला आहे. पण, २०१९ पासून हा भेदभाव काही प्रमाणात कमी झाला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये प्रशांत किशोर यांचे देखील योगदान आहे, असं खान सरांनी म्हटलं आहे.

Video: प्रशांत किशोर यांच्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांनी बिहारींना...खान सरांचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांना बिहारच्या नेतृत्वाचे स्वप्न; राजकीय पक्षाची करणार स्थापना

ईशान्य भारतातील लोकांना आपले लोक चिनी म्हणून बोलतात. ही खूप वाईट गोष्ट आहे. आपण भारतीयांसाठी यासारखी शरमेची दुसरी कोणती गोष्ट नाही. त्यांनी चीनला जातो म्हटलं तर काय करणार? छाती ठोकून आपण अरूणाचल प्रदेशवर दावा ठोकत असतो. पण, आधी आपल्याला ईशान्येच्या लोकांना आपलेसं करावं लागेल, असंही ते म्हणाले.

दुसरा भेदभाव हा बिहारी लोकांसोबत झाला आहे. बिमारू राज्य म्हणून बिहारची ओळख आहे. पण, २०१९ नंतर यात मोठा फरक पडला आहे. महाराष्ट्रात देखील बिहारबाबत मत काहीसं बदलत आहे. याचामागे अनक कारणं आहेत. जन सुराज्यचे एक प्रशांत किशोर आहेत, त्यांचे देखील यात योगदान आहे, असं खान सर म्हणाले.

Video: प्रशांत किशोर यांच्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांनी बिहारींना...खान सरांचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Prashant Kishor: प्रशांत किशोर यांचा दावा का ठरला फोल? भाजप 303 पार वर होते ठाम

महाराष्ट्राबद्दल काय म्हणाले खान सर?

२०१९ मध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी ज्या पक्षाची रणनीती बनवली तो पक्ष जिंकला आहे. पक्षांनी त्यांना पैसे देऊ केले, पण ते म्हणाले, मला पैसे देऊ नका, पण जे बिहारी कामगार याठिकाणी मजुरी करायला येतात त्यांना बिहारी म्हणून त्रास देऊ नका. हीच माझी इच्छा आहे. प्रशांत किशोर यांच्यामुळे आता यात घट झाली आहे. कोणाचे खरंच चांगलं काम असेल तर त्याचे कौतुक करायला हवं. नाहीतर लोक चांगलं काम करणे सोडून देतील, असं खान सर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.