Narendra Modi Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रमातून जनतेसोबत संवाद साधला. मन की बातचा हा ११३ वा भाग आहे. याआधी 28 जुलै रोजी पीएम मोदींनी मन की बातच्या 112 व्या एपिसोडला संबोधित केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी आजच्या भागात पॅरिस ऑलिम्पिक, मॅथ्स ऑलिम्पियाड, आसाम मोइदम, टायगर डे, जंगलांचे संवर्धन आणि स्वातंत्र्य दिनाविषयी चर्चा केली.