Kangana Ranaut: कंगनाच्या कानशिलात लगावणारी CISF जवान इतकी का संतापली? कुलविंदरच्या नातेवाईकानं सांगितलं

या प्रकरणी अशा प्रकारे मारहाण केल्याप्रकरणी संबंधित कुलविंदर कौर नामक महिला कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Kangana Ranaut: कंगनाच्या कानशिलात लगावणारी CISF जवान इतकी का संतापली? कुलविंदरच्या नातेवाईकानं सांगितलं
Updated on

नवी दिल्ली : चंदीगड विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका सीआयएसफ महिला जवानानं नवनिर्वाचित खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कानशिलात लगावल्यानं मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणी मारहाण करणाऱ्या कुलविंदर कौर या सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण कंगनाच्या कानशिलात लगावण्याइतकं नेमकं काय घडलं होतं, याचं कारण आता समोर आलं आहे. (What exactly happened at Chandigar Airport with Kangana Ranaut and CISF jawan Kulvinder Singh told her relative SherSingh Mahiwal)

कुलविंदर कौर हिच्या नातेवाईकांनी एएनआयशी बोलताना चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं आहे? कुलविंदर कौरचे नातेवाईक शेरसिंग माहिवाल यांनी सांगितलं की, सुरक्षेच्या कारणास्तव नियमानुसार कुलविंदरनं कंगनाला तिची पर्स आणि फोन कन्व्हेअर बेल्टवर स्कॅनिंगसाठी ठेवण्यास सांगितलं.

पण यासाठी कंगनानं नकार दिला आणि तिनं यावेळी शेतकऱ्यांविरोधात आणि आमच्या आई-बहिणींविरोधात वाईट शब्द वापरले. त्यामुळं हे कुलविंदरनं तिच्या कानशिलात लगावणं हे स्वाभाविक होतं. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे" पण मी अद्याप कुलविंदरशी बोललेलो नाही, असंही शेरसिंग यांनी यावेळी सांगितलं.

Kangana Ranaut: कंगनाच्या कानशिलात लगावणारी CISF जवान इतकी का संतापली? कुलविंदरच्या नातेवाईकानं सांगितलं
Narendra Modi: कुठं होणार नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी? नवी माहिती आली समोर

या प्रकरणी पुढे काय?

कंगना राणावत मारहाण प्रकरणात सीआयएसएफ महिला जवान कुलविंद कौर हिला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती देखील नेमण्यात आली आहे. त्यामुळं या समितीनं आपला अहवाल सादर केल्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलवर काय कारवाई करायची हे निश्चित होईल.

Kangana Ranaut: कंगनाच्या कानशिलात लगावणारी CISF जवान इतकी का संतापली? कुलविंदरच्या नातेवाईकानं सांगितलं
AAP-Congress Alliance: दिल्लीत आप-काँग्रेसची मैत्री संपुष्टात! केजरीवालांचा विधानसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय

कंगनाची बॉलिवूडवर नाराजी

कंगना राणावत हिच्यावर ओढवलेल्या या प्रसंगावरुन तिच्या बाजूनं बॉलिवूडमधील कोणीही बोललं नाही यावर तिनं नाराजी व्यक्त केली आहे. सर्वजण कुठे गेले आहेत? गप्प का आहेत? असा सवालही तिनं केला आहे. पण कंगनावरील या प्रसंगावर अनेक जण तिच्याविरोधात सोशल मीडियावर व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं. काहींनी हे चुकीचं असल्याचंही म्हटलं आहे. तसंच संगीतकार विशाल ददलानी यांनी देखील ट्विट करत सीआयएसएफच्या महिला जवानाची बाजू घेत जर तिला नोकरीवरुन काढण्यात आलंच तर मी तिला १ लाख रुपये पगाराची नोकरी देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.