भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे नेमकं काय झालं?

Republic Day : सुमारे 150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश ब्रिटीशांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. परंतु भारत स्वतंत्र झाला असला तरी भारत देश प्रजासत्ताक झाला तो 26 जानेवारी 1950 या दिवशी.
Republic Day of India
Republic Day of IndiaEsakal
Updated on

भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day of India):

26 जानेवारी 2022 रोजी आपण भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करणार आहोत. कारण 1950 साली याच दिवशी भारताची राज्यघटना (Indian Constitution) अंमलात आली आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. परंतु भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे नेमकं काय झालं? हेच आज आपण पाहणार आहोत.

भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे नेमकं काय झाले?

अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झाले तर एखादा खेळ खेळायचा असेल किंवा एखादी संस्था किंवा कंपनी चालवायची असेल तर त्यासाठी काही नियम ठरलेले असतात. त्या नियमांच्या अधीन राहून खेळ खेळले जातात किंवा संस्था चालवल्या जातात. भारत (India) देशाला चालवण्यासाठीही संविधानाच्या माध्यमातून काही नियम घालून दिले आहेत. याच नियमांना अनुसरुन देशाचं कार्य चालते. संविधान हा देशाचा मुलभूत कायदा (Law) असतो. इतर सर्व कायदे संविधानापेक्षा दुय्यम असतात. आपल्या देशाचं सरकार, न्यायलयं तसेच प्रशासन यांना या संविधानात लिहून दिलेल्या नियमांच्या किंवा कायद्यांच्या चौकटीत राहूनच काम करावं लागते. (What exactly happened when India became a republic?)

Republic Day of India
प्रजासत्ताक दिन: भारत जगाला दाखवणार आस्मानी ताकद; राफेलसह 75 विमानं सज्ज

15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य तर 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक-

सुमारे 150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश ब्रिटीशांच्या जोखडातून स्वतंत्र (Independence Day) झाला. परंतु भारत स्वतंत्र झाला असला तरी भारत देश प्रजासत्ताक झाला तो 26 जानेवारी 1950 या दिवशी. भारत देश जरी 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला असला तरी तो कसा चालवला जाणार याबाबत कोणताही अधिकृत मार्ग ठरला नव्हता. भारतातील निर्णय प्रक्रिया तसेच धोरणे ठरवण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी राज्यघटना महत्त्वाची होती आणि स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या माध्यमातून तो ठरवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.

भारतीय संविधान सभा -

भारतीय संविधान तयार करण्याचं काम केलं ते भारतीय संविधान सभेने अर्थात घटना समितीने. डॉ. राजेंद्र प्रसाद (Dr. Rajendra Prasad) हे घटना समितीचे अध्यक्ष होते. 1946 च्या कॅबिनेट मिशन प्लानद्वारे ही सभा स्थापन करण्यात आली. संविधान सभेने संविधान तयार करण्यासाठी एकूण 22 समित्या तयार केल्या होत्या. यापैकी मसुदा समिती, मूलभूत हबक्क सल्लागार समिती तसेच केंद्र अधिकार समिती या महत्त्वाच्या समित्या होत्या. सर्व समित्यांनी दिलेल्या अहवालांवरून संविधान सभेचा मसुदा तयार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने संविधानाचा मसुदा तयार केला. हा मसुदा फेब्रुवारी 1948 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्यावरील सूचना आणि दुरुस्त्यांवर चर्चांनंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकृत करण्यात आले. आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनला.

Republic Day of India
आता दरवर्षी 23 जानेवारीपासून सुरू होणार प्रजासत्ताक दिन उत्सव

भारतीय संविधान (Constitution) -

‘आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही...’ ही वाक्ये आपण शाळेत म्हटली असतीलच किंवा आपल्या मुलांना म्हणताना ऐकलं असेल. ही वाक्ये म्हणजेच भारतीय संविधानाचा सरनामा किंवा उद्देशपत्रिका होय. या सरनाम्याला संविधानाचा आरसा म्हटले जाते. कारण भारतीय संविधान ज्या मुलभूत गोष्टींवर लिहिले गेले आहे. ते सर्व तत्व आपल्याला या सरनाम्यात आढळतात.

या सरनाम्याची सुरूवातच ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी होते. भारतातील लोक सत्तेचं उगमस्थान आहेत, हेच यातून सांगितले गेलंय. न्याय, समता, बंधुता, राष्ट्राची एकता व एकात्मता ही मुलभूत उद्दिष्टे तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे राजकीय व्यवस्थेचं स्वरूप निश्चित करण्यात आलं आहे.

Republic Day of India
Republic Day : तिरंगा फडकवण्याचे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

थोडक्यात याच नियमांच्या आधारे आपला देश चालवला जातो. या नियमांना संविधानाच्या भाषेत ‘कायदे’ म्हटले जाते. आपले हक्क, कर्तंव्य, आपली राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था सारे काही संविधानातील याच कायद्यांआधारे चालते.

हे कायदे संविधानाच्या रुपात 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले आणि भारत देश प्रजासत्ताक झाला. त्यामुळे आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून दरवर्षी उत्साहात साजरा करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.