नवी दिल्ली : देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना विषाणूच्या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी लसीकरणाचे अभियान सुरु झाले आहे. आतापर्यंत देशातील 30 कोटीहून अधिकांना लस देण्यात आली आहे. भारतातील एकूण लोकसंख्येचा विचार करता जवळपास 25 टक्के लोकसंख्येला सिंगल अथवा डबल डोस दिला गेला आहे. मात्र, देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचं असं म्हणणं आहे की, केंद्र सरकार फक्त बोगस दावे करुन आपलीच पाठ थोपटत आहे. मात्र, काँग्रेसच्या या टीकेवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या पद्धतीने उत्तर दिलंय.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलं होतं की, जुलै महिना आलाय मात्र, अद्याप लस आलेली नाहीये. त्यांच्या या टीकेवर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय की, कालच त्यांनी देशातील लसीकरण मोहिमेसंदर्भातील वास्तव गोष्टी सर्वांसमोर ठेवल्या आहेत. मात्र, राहुल गांधींजी तुमची समस्या आहे तरी काय? असं वाटतंय की, ते वाचत नाहीत अथवा त्यांना समजत नाही. मग्रुरी आणि दुर्लक्ष करण्याच्या व्हायरसवर कसल्याही प्रकारची लस उपलब्ध नाहीये. काँग्रेसने आपल्या नेतृत्वात संपूर्ण बदल करण्याबाबत आता विचार केला पाहिजे.
भारतातील लसीकरण मोहिमेच्या गतीबाबत विरोधी पक्ष केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. हे प्रकरण जेंव्हा न्यायालयात पोहोचले तेंव्हा बेंचने आदेश दिले की लसीकरणासंदर्भात खासकरुन लस खरेदी बाबत असलेली संभ्रमाची परिस्थिती दूर करण्याची गरज आहे.
लसीकरणासंबंधी बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्यांवर काल गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. डॉ. हर्षवर्धन यांनी याप्रकारावर नाराजी व्यक्त करत म्हटलंय की, थोडी तरी लाज बाळगा. या संकटाच्या प्रसंगी कमीतकमी राजकारण करणं तरी सोडून द्या, असंही त्यांनी म्हटलंय. कोरोना लसीकरणावर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आज चांगलेच भडकले. ‘या संकटाच्या काळात तरी राजकारण करणे सोडा, थोडी तरी लाज बाळगा,‘ अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. सौम्य भाषेत बोलणाऱ्या मोजक्या भाजप नेत्यांमध्ये डॉ. हर्षवर्धन गणले जातात. मात्र लसीकरणावरून रोज होणाऱ्या टीकाटिप्पणीने ते संतापले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव किंवा इतरांचे नाव न घेता त्यांनी टीकेला पाठोपाठ ट्विट करून उत्तर दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.