Niti Aayog Meeting : निती आयोगाच्या बैठकीत काय घडलं?, नरेंद्र मोदी काय म्हणाले?

Niti Aayog Meeting
Niti Aayog Meeting
Updated on

Niti Aayog Meeting | नवी दिल्ली: दिल्लीच्या प्रगती मैदानावर शनिवारी झालेल्या निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या (GCM) आठव्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २९४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एक समान दृष्टीकोन तयार करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी राज्याच्या प्रमुखांना देखील सुचना केल्या.

नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांना योग्य दिशेने पावले उचलण्याचे निर्देश दिले. यावेळी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मोदींनी नागरिकांची स्वप्ने पूर्ण करणारे कार्यक्रम तयार करण्यासाठी त्यांनी राज्यांना आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण निर्णय घेण्यास सांगितले.

राज्य प्रगत तर देश प्रगत -

निती आयोगाने बैठकीत झालेल्या चर्चेची माहिची ट्वीटरवर दिली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते. २०४७ मध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामायिक दृष्टी विकसित करण्याच्या महत्त्वावर नरेंद्र मोदी यांनी भर दिला.

Niti Aayog Meeting
Devendra Fadnavis : राहुल गांधी सावरकरांच्या केसाऐवढे देखील होऊ शकत नाहीत - देवेंद्र फडणवीस

आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण निर्णय घेण्याचे आवाहन

आयोगाने दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण निर्णय घेण्याचे आवाहन केले, जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील आणि नागरिकांची स्वप्ने पूर्ण करणारे कार्यक्रम राबवतील.

निती आयोगाच्या आठव्या बैठकीत २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला ११ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले. यावर निती आयोगाचे सिईओ बी व्ही आर सुब्रह्मण्यम म्हणाले, हे यापूर्वीही पाहिले आहे. परंतु आम्ही अनेक लोकांची लिखीत निवेदने आमच्याकडे आहेत. त्या सर्वांना विचारात घेऊन धोरण तयार केले आहे.

Niti Aayog Meeting
Sharad Pawar : इमारत बांधताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही; शरद पवारांची दुसरीच नाराजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.