Aadhaar Latest News: आधार कार्ड सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाचे कागदपत्रं आहे. पॅन कार्ड (PAN) बनवण्यापासून ते इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करेपर्यंत आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी आधार कार्डची आवश्यकता असते. पण या आधार कार्डाच्या बाबतीत काही प्रश्न आहेत, जसे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या आधार कार्डाचे काय होते. याचे उत्तर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीचे राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संसदेत दिले. (What happens to a person Aadhaar card in case of death)
आधार कार्ड (Aadhaar ) डिएक्टिव्हेट होत नाही
इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांना लोकसभेत हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे आधार कार्ड किंवा आधार नंबर डिअॅक्टिव्हेट होत नाही, कारण सध्याच्या घडीला अशी कोणतेही तरतूद नसल्याचे ते म्हणाले. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा आधार नंबर रद्द करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याची माहिती चंद्रशेखर यांनी दिली. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 मधील संशोधनाच्या ड्रॉफ्टवर UIDAI कडून सुचना मागितल्या होत्या. जेणेकरुन मृत्यू प्रमाण पत्र (Death Certificate) जारी करतेवेळी मृत व्यक्तीचा आधार नंबर डेथ सर्टिफिकेटशी लिंक करतील.
देशात जन्म आणि मृत्यू रजिस्ट्रार जन्म –मृत्यूच्या आकड्यांचे कस्टडियन आहेत. आधारला डिअॅक्टिव्हेट करण्यासाठी रजिस्ट्रारकडून मृत व्यक्तीचा आधार क्रमांक घेण्याची अद्याप कोणतीही यंत्रणा नाही. पण एकदा या संस्थांमध्ये आधार क्रमांक सामायिक करण्याची प्रक्रिया तयार झाली की,रजिस्ट्रार मृत व्यक्तीचा आधार नंबर निष्क्रिय करण्यासाठी UIDAI सोबत शेअर करणे सुरु करतील. आधारला डीअॅक्टिव्हेट करणे किंवा आधारला डेथ सर्टिफिकेटशी लिंक केल्याने आधार कार्ड धारकाच्या मृत्यूनंतर याचा चुकीचा वापर होण्यावर आळा बसेल. पण ही व्यवस्था सुरु होण्यासाठी काही काळ जाईल, सध्या याबाबत काम सुरु आहे, येत्या काळात ही प्रक्रिया पुर्ण होईल आणि मृत पावलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड डिअॅक्टिव्हेट करता येईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.