कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्तेचं पुढं होतं काय? देशात 'या' पाच ठिकाणी सापडलं होतं मोठं 'घबाड'

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे
what happens to unaccounted cash seized in income tax raids Know 5 famous cases dhiraj sahu
what happens to unaccounted cash seized in income tax raids Know 5 famous cases dhiraj sahu eSakal
Updated on

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सापडलेल्या नोटा मोजणारी माणसेच नव्हे, तर यंत्रेही थकत आहेत.

या बेहिशेबी पैशांचा संपूर्ण साठा धीरज साहू आणि त्यांच्याशी संबंधित व्यावसायिक समूह, वितरक आणि इतरांनी देशी दारूच्या रोख विक्रीतून मिळवला आहे, असा आयकर विभागाचे म्हणणे आहे. देशातील आजपर्यंत केलेल्या कुठल्याही कारवाईदरम्यान जप्त केलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रोकड आहे.

यापूर्वी 2019 मध्ये जीएसटी इंटेलिजन्सने एका व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकून 197 कोटी रुपयांची रोकड कानपूरमधून जप्त केली होती. 2018 मध्ये तामिळनाडूमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली होती, जिथे आयकर विभागाने रस्ते बांधणाऱ्या कंपनीवर छापे टाकून 163 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. धीरज साहू यांच्याव्यतिरिक्त चार प्रसिद्ध प्रकरणे आहेत जिथे मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश - कानपूर

2021 मध्ये कन्नौज आणि कानपूर येथील परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यातून 207 कोटी रुपये (196.54 कोटी रुपये रोख आणि 23 किलो सोने) जप्त करण्यात आले होते. यानंतर पियुष जैन यांना अधिक चौकशीसाठी अटक करण्यात आली, चौकशी आणि न्यायालयीन कारवाईनंतर सप्टेंबर 2022 मध्ये त्यांना जामीन मिळाला होता.

त्यानंतर पियुष जैन यांनी यासंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जात पियुष जैन यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, माझ्यावर करचुकवेगिरी आणि दंडासह 52 कोटी रुपयांचा कर थकीत आहे, अशा परिस्थितीत डायरेक्टर ऑफ जीएसटी इंटेलिजन्स (डीजीजीआय)ने 52 कोटी रुपये कापून उर्वरित रक्कम मला परत करावी. मात्र यानंतर पियुष जैन आणि त्यांच्या साथिदारांना टॅक्स आणि दंड म्हणून 497 कोटी रुपये भरावे लागणार असल्याची माहिती समोर आली होती.

what happens to unaccounted cash seized in income tax raids Know 5 famous cases dhiraj sahu
Osho Ashram : पुण्यातील ओशो आश्रमातील भूखंडांच्या विक्रीला परवानगी नाहीच, 107 कोटींच्या व्यवहाराला स्थगिती

महाराष्ट्र

ऑगस्ट 2022 मध्ये आयकर विभागाने जालना येथील पोलाद, कापड व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपरवर छापा टाकला होता, ज्यात विभागाला मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता सापडली होती. प्राप्तिकर विभागाने सुमारे 390 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त के. त्यात ५८ कोटी रुपयांची रोकड, 32 किलो सोने, हिरे-मोती आणि अनेक मालमत्तेच्या कागदपत्रांचा समावेश होता.

तामिळनाडू

2018 मध्ये तमिळनाडूमध्ये आयकर विभागाने महामार्ग बांधणाऱ्या कंपनींच्या ठिकाणांवर छापेमारी करत 163 कोटी रुपयांची रोकड तसेच 100 किलो सोने जप्त करण्यात आले होते.

what happens to unaccounted cash seized in income tax raids Know 5 famous cases dhiraj sahu
Dhiraj Sahu : ''हे पैसे कोणाचे?'' काँग्रेस खासदाराकडे घबाड सापडल्यानंतर नड्डांचा प्रश्न

पश्चिम बंगाल

तृणमूल काँग्रेस सरकारचे माजी मंत्री पार्थ चटर्जी आणि त्यांची साथिदार अर्पिता मुखर्जी यांमच्यावर ईडीने छापेमारी केली होती. यादरम्यान 40.80 कोटी रोकड, अनेक प्रॉपर्टीज, दागिने आणि गोल्ड बार जप्त केले होते. ही रोकड अर्पिता मुखर्जी यांच्या अपार्टमेंटमधून मिळाली होती.

बेहिशोबी पैशांचं होतं काय?

आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या कोट्यवधींच्या बेहिशोबी रोकडीचं होतं काय? तर मिळालेली रक्कम नेहमी काळा पैसाच नसतो, बऱ्याचदा व्यापारी घरात मोठ्या प्रमाणात पैसा साठवून ठेवतात, यात विशेष असं काही नाही. जर तुमच्या घरात आयकर विभागाच्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली तर तुम्हाला पहिल्यांदा तर या पैशांचा योग्य सोर्स सांगावा लागेल. तो तुम्ही सांगू शकले नाहीत तर आयकर विभाग ती रक्कम जप्त करते आणि तुम्हाला 137 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागू शकते.

तज्ज्ञांच्या मते मिळालेली कॅशच्या साठ टक्के टॅक्स कापून उरलेली रक्कम धीरज साहू यांना वापस दिली जाऊ शकते. मात्र यासाठी त्यांना टॅक्स न भरता ही रक्कम गोळा केल्याचे सिद्ध करावे लागेल. मात्र जर हा पैसा अवैध कामातून जमा केल्याचे उघड झाले तर त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई होईल आणि पैसा देखील परत मिळणार नाही.

what happens to unaccounted cash seized in income tax raids Know 5 famous cases dhiraj sahu
Article 370 : सप्टेंबर महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

धीरज साहू यांच्याकडे मिळालेल्या पैशांचे काय होणार?

धीरज साहू यांच्याकडून जप्त झालेली रक्कम बँकेच्या ताब्यात ठेवली जाईल आणि इनकम टॅक्सकडून त्यांना नोटिस पाठवली जाईल ज्यामध्ये त्यांच्याकडे सापडलेल्या संपत्तीची माहिती असेल. त्यांना या सर्व संपत्तीचा सोर्स सांगावा लागेल, त्यासाठी काही दिवसांचा वेळ मिळेल. त्यांच्या उत्तराचे असेसमेंट केलं जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.