तुमच्या शहरावर बॉम्ब पडला तर काय होईल? पाहा कशी होऊ शकते अवस्था

nuclear bomb
nuclear bomb
Updated on

पुणे - हजारो मैलांवर असलेल्या बैरुतमधल्या स्फोटाने भारतात बसलेल्या मलाही भावनिकदृष्ट्या हादरवून टाकलं. बैरुत स्फोटाबद्दल मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार जवळपास 3 लाख लोकांना याचा दणका बसला आहे. स्फोटाचे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची तीव्रता जाणवते. डोकं सुन्न करणारे हे व्हिडिओ आहेत. या घटनेमुळे जगावरही परिणाम झाला आहे. बैरुतवर झालेला हल्ला अणु हल्ला होता का? अनेकांच्या डोक्यात असा प्रश्न आला. स्फोटाच्या आधी हवेत पसरलेले धुराचे लोट पाहून जगभरात अणु हल्ला असल्याचे तर्क वितर्क लढवले गेले. इंटरनेटवर लेबनॉन कसं उद्ध्वस्त झालं यावरून वेगवेगळ्या अफवाही पसरल्या. त्यानंतर तज्ज्ञांनी हे धुरांचे ढग अणु बॉम्बचे नव्हते हे सांगितलं. दमट हवेच्या दाबामुळे पाण्याचे ढगात रुपांतर झालं होतं. लेबनॉनमध्ये अमोनियम नायट्रेटच्या स्फोटांनी हादरवून टाकलं. आपणही अशा शहरांमध्ये राहतो जिथं असा विध्वंसक हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

75 वर्षांपूर्वी 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर लिटल बॉयचा हल्ला झाला. तो जगातला पहिला अणु हल्ला होता. या हल्ल्याने जपानला उद्ध्वस्त केलं आणि अखेर शरणागती पत्करल्यानं दुसरं महायुद्ध संपलं. लिटल बॉय डागण्यात आला तेव्हा 70 हजार लोकांचा जीव गेला होता. तर त्यानंतर बॉम्ब हल्ल्याच्या परिणामामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही तेवढीच होती. लिटल बॉयच्या तडाख्यात असतानाच नागासाकीवर फॅट मॅनचा हल्ला करण्यात आला यात आणखी 70 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. 

विकसित जगाचे साक्षीदार आपण आहे. पण याच जगात मुत्सद्दीपणात आलेलं अपयश, सांस्कृतिक आणि धार्मिक असहिष्णूता, एकमेकांवर कुरघोडी करणारं राजकारण, धोरणांच्या निर्मितीमध्ये अतिरेकीपणा या गोष्टींनी मानवतेला बाजूला सारलं आहे. 1945 पासून जगात शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत पण एखाद्या शहरावर, प्रार्थनास्थळावर हल्ला झाला की त्या प्रयत्नांना हरताळ फासल्यासारखंच घडतंय का असा प्रश्न पडतो?

बैरुत हल्ल्यानंतर आणखी एक प्रश्न मनाला भयभीत करतो तो म्हणजे आपल्या शहराचा सुद्धा असा विध्वंस होऊ शकतो का? त्याची शक्यता किती आहे? खरंतर खूपच कमी शक्यता आहे पण तरीही हल्ला होणारच नाही असं म्हणता येणार नाही. ख्राइस्टचर्चमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या खूणा अद्याप ताज्या आहेत. शांतताप्रिय ठिकाणी झालेला तो हल्ला विचार करायला लावणाराच आहे. अंहकारी देशांकडे अणु बॉम्बसारखी घातक शस्त्रे आहेत. त्याचा हल्ला झाल्यास जगाचा शेवट दूर नाही.

रशिया आणि अमेरिकेकडे सुसज्ज शस्त्रात्रे आहेत. भारताचे शेजारी देश असेलल्या चीन आणि पाकिस्तानकडेही अण्वस्त्रे आहेत. यामुळेच भारत आणि इस्रायल यांनीही आपल्या सुरक्षेसाठी अण्वस्त्र सज्ज राहण्यावर भर दिला आहे. परिणामी यातील अनेक देशांना संबंध विस्तारण्याची आवश्यकता वाटत नाही. प्रत्येकवेळी पुलवामा किंवा गलवान खोऱ्यासारख्या घटना होण्यासाठी कारणे असतात. अनेक देशांकडून अशा या न्यूक्लिअर जगात इतकी विध्वंस घडवणारी भयानक गोष्टही सहजपणे घेतली जाते हे भयंकर आहे. 

Read Also In English on SakalTimes

सध्या एक अशी लिंकही व्हायरल होत आहे ज्यामध्ये अणु हल्ला झाला तर त्याच्या तीव्रतेनुसार किती भागात विध्वंस होऊ शकतो. किती लोकसंख्येला फटका बसू शकतो याची आकडेवारी त्यावर दिसते. जगातील कोणत्याही शहराचं लोकेशन यामध्ये निवडता येतं. त्याशिवाय लिटल बॉय पासून अद्ययावत अशा अणुबॉम्बचे पर्यायही दिसतात. त्यातून होणारा विध्वंस किती भयंकर आहे याची जाणीव होते.  Outrider चा हा नकाशा असून यामध्ये अणु हल्ला झाल्यास किती नुकसान होऊ शकतं याचा अंदाज वर्तवला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.