हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्याने सहकारी लेफ्टनंटने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत हवाई दलाच्या डॉक्टरांनी पीडित महिलेला दिलेल्या सल्ल्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना महिलांची टू फिंगर टेस्ट करू नये असा सल्ला देणारे पत्रदेखील लिहिलं आहे.
टू फिंगर टेस्ट करण्यास भारतात बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आठ वर्षापूर्वी निर्णय देताना पूर्णपणे बंदी घातली होती. महिला आयोगाने हवाई दल प्रमुख व्ही आर चौधरी यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्यास आणि कारवाई करण्यास सांगितलं आहे.
काय आहे टू-फिंगर टेस्ट?
''ही टेस्ट म्हणजे बलात्कार सारख्या दुष्ट कृत्याची पुन्हा यातना अनुभवण्यासमान आहे'' असे मत टु- फिंगर टेस्टला विरोध करणाऱ्यांचे आहे. या टेस्टमध्ये डॉक्टर पीडित महिलेच्या प्रायवेट पार्टमध्ये दोन बोट घालून तपासणी करतात की ती व्हर्जिन आहे की नाही. जर बोट सहज आतमध्ये गेले तर मानले जाते की ती महिला सेक्स्युअली अॅक्टिव्ह आहे. त्या जागी असलेल्या हायमनमुळे देखील हे समजते. पण या टेस्टच्या प्रक्रियेवर टीका केली जात आहे. सुप्रीम कोर्टने या टू-फिंगर टेस्टवर बंदी घातली आहे. हे कोणत्याही पीडित महिलेच्या अधिकारांच्या विरोधात आहे. त्याशिवाय हे अवैज्ञानिक आहे आणि तज्ज्ञांचे मत आहे की, या टेस्टद्वारे बलात्कार झाला आहे ती नाही हे सांगणे अवघड आहे.''
महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणी आवश्यक पावले उचलण्यासाठी आणि वायुसेनेच्या डॉक्टरांना सरकार आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी आवश्यक ज्ञान देण्यासाठी हवाईदल प्रमुखांना पत्र लिहिले. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतीय हवाई दलाच्या एका 28 वर्षीय महिला अधिकाऱ्याच्या 'टू-फिंगर टेस्ट ''वर तीव्र आक्षेप घेतला आहे आणि हवाई दल प्रमुखांना आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. महिला अधिकाऱ्याने सहकारी लेफ्टनंटवर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.त्याची पुष्टी कारण्यासाठी टु फिन्गर टेस्ट करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.