कर्नाटकात दुधावरून वाद पेटला आहे. कर्नाटकात निवडणुकीपूर्वी दूधयुद्धामुळे राजकीय तापमान वाढल्याचं पाहायला मिळत आहे. या वादात दुध उत्पादन करणारे देशातील दोन मोठे ब्रँड समोरासमोर आले आहेत.
या वादाच्या पार्श्वभूमिवर रविवारी ब्रुहत बेंगलुरु हॉटेल्स असोसिएशन या बेंगळुरूमधील हॉटेल असोसिएशनने जाहीर केले की ते शहरातील अमूल उत्पादने वापरणार नाहीत आणि कर्नाटकातील स्थानिक शेतकर्यांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक ब्रँड नंदिनी वापरला जाईल. आश्चर्याची बाब म्हणजे हॉटेल असोसिएशनच्या या निर्णयापूर्वीच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी अमूल ब्रँडला विरोध करून निवडणुकीपूर्वी हा महत्त्वाचा राजकीय मुद्दा बनवला होता.
त्यामुळे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की कर्नाटकात अमूल ब्रँडचा वाद नेमका काय आहे? दूध उत्पादक ब्रँड नंदिनी राज्यात अचानक का प्रसिद्धीस आला? याशिवाय निवडणुकीपूर्वी ही बाब राजकारणाच्या केंद्रस्थानी का आबे आणि यामुळे राजकीय पक्षांना काय फायदा किंवा तोटा होतो?
हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
काय आहे अमूल विरुद्ध नंदिनी वाद?
देशातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या अमूल आणि कर्नाटकातील नंदिनी या स्थानिक ब्रँडमधील वाद हा पाच दिवसांपूर्वी सुरू झाला . खरं तर, 5 एप्रिल रोजी, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन (GCMMF), जे अमूल ब्रँड अंतर्गत डेअरी उत्पादने विकतात, त्यांनी ट्विट केले होते की ते कर्नाटकात प्रवेश करण्यास तयार आहेत.
अमूलने आपल्या ट्वीट केलं की, दूध आणि दह्यासह ताजेपणाची एक नवीन लाट लवकरच बेंगळुरूमध्ये येत आहे. अधिक तपशील लवकरच येत आहेत. अलर्ट लॉन्च करा.
अमूलच्या या ट्विटनंतर कर्नाटकातही राजकारण पेटलं आहे. राज्यातील आगामी निवडणुका लक्षात घेऊन नव्या ब्रँडची एंट्री हा निवडणुकीचा मुद्दा बनवण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत.
यासाठी, या पक्षांनी कर्नाटकातील स्थानिक डेअरी उत्पादक कर्नाटक मिल्क फेडरेशन (KMF) चा वापर करण्यात आला आहे, जी आपली उत्पादने नंदिनी ब्रँड अंतर्गत विकते. अमूलच्या ट्विटनंतर, Save Nandini (#SaveNandini) आणि गो बॅक अमूल (#GobackAmul) सारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करू लागले. काही रिपोर्टनुसार कर्नाटक मिल्क फेडरेशन हा देशातील दुधाचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार आहे.
या प्रकरणावर राजकारण कसं तापलं?
अमूलचा कर्नाटकमधील प्रवेश हा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा बनला असून प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि जेडीएस या विरोधात आक्रमक झाली आहे. राज्यातील सर्वोत्कृष्ट डेअरी ब्रँडपैकी एक असलेल्या नंदिनीला संपवण्याचा कट भाजपने रचल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 8 एप्रिल रोजी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अमूलविरोधात आघाडी उघडत नंदिनीचा मुद्दा राज्याच्या अस्मितेशी जोडला. ते म्हणाले की, सर्व कन्नड कॉम्रेड्सनी शपथ घ्यावी की ते अमूलची उत्पादने खरेदी करणार नाहीत.
कर्नाटकातील विरोधकांचा असा आरोप आहे की भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अमूल आणि नंदिनी या दोन सहकारी ब्रँडचे विलीनीकरण करू इच्छित आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की डिसेंबर 2022 मध्ये, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कर्नाटकातील मंड्या येथे KMF च्या 260 कोटी रुपयांच्या मेगा डेअरीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी कथितपणे नंदिनी आणि अमूल एकत्र यावे असे म्हटले होते. शहा यांच्या वक्तव्यावर निशाणा साधत विरोधकांचे म्हणणे आहे की, भाजपला कर्नाटक राज्याचा एक महत्त्वाचा ब्रँड नष्ट करायचा आहे.
दुध आणि त्याभोवतालचं राजकारण नेमकं निवडणूकीत कोणाला फायदा मिळवून देईल हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.