Udhyanidhi Stalin Controversy: द्रविड विरुद्ध सनातन! संघर्षाचा इतिहास काय सांगतो? आत्ता का बनला आहे राजकीय मुद्दा?

नुकताच हा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. याचं कारण म्हणजे उदयनिधी स्टालिन यांनी केलेलं एक वक्तव्य. त्यांच्या विधानानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय खळबळ माजली आहे.
UdayNidhi Stalin
UdayNidhi StalinSakal
Updated on

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन झालं. जयललिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता. जयललिला यांचं नाव तर हिंदू आहे. पण मग त्यांना दफन का करण्यात आलं? जयललिता यांना त्यांच्या मृत्यूनंतर दफन करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची समाधी बनवण्यात आली.

अशाच प्रकारे २०१८ साली जयललिता यांचे सर्वात मोठे राजकीय विरोधक असलेले एम करुणानिधी यांच्या मृतदेहालाही अग्नी न देता दफन करण्यात आलं. पण असं का? याचं उत्तर आहे जयललिता आणि करुणानिधी या दोघांचंही द्रविड चळवळीशी असलेला संबंध. द्रविड चळवळ ही हिंदू धर्माच्या कोणत्याही परंपरेला अथवा प्रथा परंपरांना मानत नाही. जयललिता एका द्रविड पक्षाच्या प्रमुख होत्या, या पक्षाचा पायाच ब्राह्मणवादाला विरोध करण्यासाठी घालण्यात आला होता. ब्राह्मणवादाच्या विरोधाचं प्रतीक म्हणून द्रविड आंदोलनाशी संलग्न असलेले लोक दहन संस्कारांच्या ऐवजी दफन करण्याचा विधी करणे पसंत करतात.

UdayNidhi Stalin
Udhyanidhi: सनातन धर्माचा मी आदर करते, तुम्ही...; ममता बॅनर्जी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना सुनावलं

द्रविड चळवळीची ही रीत सांगण्यामागचं कारण म्हणजे यातून दिसून येतं की सनातन परंपरेचा किती विरोध केला जातो. नुकताच हा मुद्दा प्रकाशझोतात आला आहे. याचं कारण म्हणजे उदयनिधी स्टालिन यांनी केलेलं एक वक्तव्य. त्यांच्या विधानानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय खळबळ माजली आहे. या निमित्ताने द्रविड - सनातन संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

काय म्हणाले होते उदयनिधी?

उदयनिधी म्हणाले की सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही, त्यांना संपवूनच टाकावं लागतं. आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. ते आपल्याला संपवायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सनातन धर्मालाही संपवायचं आहे. सनातन हे नाव संस्कृतमधलं आहे. पुढे स्टालिन असंही म्हणाले की, सनातन म्हणजे काय आहे? सनातनचा अर्थ आहे की काहीही बदलायचं नाही आणि सगळं काही स्थायी आहे. पण द्रविड मॉडेलमध्ये बदलाला महत्त्वा आहे आणि समानताही सांगितलेली आहे.

UdayNidhi Stalin
Udhyanidhi: सनातन धर्माचा मी आदर करते, तुम्ही...; ममता बॅनर्जी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना सुनावलं

सनातन - द्रविड संघर्षाचा इतिहास काय सांगतो?

आजतकने दिलेल्या माहितीनुसार, द्रविड आणि सनातन यांच्यातल्या संघर्षाच्या मुळाशी भेदभाव आणि अस्पृश्यता आहे. १९२४ मध्ये केरळमधल्या त्रावणकोर इथल्या राजाच्या मंदिरात येण्या जाण्याच्या रस्त्यावर दलितांना प्रवेश बंद करण्यात आला. त्यामुळे दलितांचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्यांनी या गोष्टीचा विरोध करण्यास सुरुवात केली. जे लोक याचा विरोध करत होते, त्यांना राजाच्या आदेशाने अटक करण्यात आली त्यामुळे आता या आंदोलनाला नेतृत्वच राहिलं नाही. त्यानंतर या आंदोलनामध्ये ईवी रामास्वामी म्हणजेच पेरियार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी दीर्घकाळ दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि तुरुंगवासही भोगला.

त्रावणकोरच्या राजाच्या विरोधासाठी पेरिया यांनी मद्रास राज्य काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्रावणकोरमध्ये आंदोलनाचं नेतृत्त्व केलं. त्रावणकोरला पोहोचताच त्यांचं राजकीय स्वागत झालं, पण त्यांनी हे स्वागत नाकारलं आणि राजाचा विरोध दर्शवला. आंदोलनादरम्यान असं आढळून आलं की चेरनमादेवी शहरामध्ये काँग्रेसच्या अनुदानावर चाललेल्या शाळेमध्ये ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना जेवण वाढताना दुजाभाव करण्यात आला आहे.

पेरियार यांनी यावेळी शाळेत सर्वांसोबत समान वागण्याचा आग्रह धरला. पण ना शाळा प्रशासनाने त्यांचं म्हणणं ऐकलं, ना काँग्रेसने शाळेचं अनुदान रोखलं. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि आत्मसन्मान आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाचा उद्देश ब्राह्मणेतर (ज्यांना द्रविड म्हटलं जातं) लोकांमध्ये आत्मसन्मानाची भावना जागवणं हा होता.

पुढे जाऊन पेरियार यांचं हेच आंदोलन व्यापक स्वरुपात समोर आलं. पेरियार यांनी सनातनी पद्धतींवर आक्षेप घेत, अनेक गोष्टींबद्दल प्रश्न उपस्थित केले. लग्नपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. बाल विवाहाला विरोध, विधवा पुनर्विवाह, महिलांचं शिक्षण असे अनेक विषय त्यांनी हाताळले.

याशिवाय द्रविड सनातन संघर्षाबद्दल आणखीही काही समजूती आहेत. ज्याप्रमाणे आर्य भारतातलेच मूळचे रहिवासी होते की बाहेरून आले होते, याबाबत इतिहासकारांमध्ये दुमत आहे, त्याचप्रमाणे द्रविड आणि सनातन यांच्यातल्या संघर्षाबद्दलही दुमत आहे. द्रविड संस्कृतीबद्दल संशोधन करणाऱ्या एका गटाचं मत आहे की, ही संस्कृती भारतातल्या प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. ही फक्त दक्षिणेतच नाही, तर उत्तरेतही पसरलेली आहे.

तर एक गट असंही मानतो की उत्तरेकडून द्रविड आले, त्यांनी आर्यांवर हल्ला करून त्यांना बाजूला केलं. पण काही इतिहासकार आर्य बाहेरून आले होते, हा सिद्धांतही नाकारतात, त्यामुळे हा विचार चुकीचा सिद्ध होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()