Odisha Train Accident : रेल्वे अपघाताचे असलेले कारण 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' नेमकं आहे तरी काय?

ओडिशातील बालासोर 2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 288 जणांचा बळी गेला.
Odisha Train Accident : रेल्वे अपघाताचे असलेले कारण 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' नेमकं आहे तरी काय?
Updated on

ओडिशातील बालासोर 2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 288 जणांचा बळी गेला. तर 900 हून अधिकजण जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघाताचे मोठं कारणं समोर आलं आहे. . 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलामुळे हा अपघात झाला, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. दरम्यान, 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' म्हणजे काय? अशी चर्चा सुरु आहे. (What is 'electronic interlocking'? Cause behind Balasore train accident)

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये काय होतं?

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इंटरलॉकिंग ही रेल्वेमधील सिग्नल यंत्रणा योग्यरितीने काम करावी म्हणून कार्यन्वयित असलेली यंत्रणा आहे. या इंटरलॉकिंगच्या माध्यमातून ट्रेन्सला रेल्वे स्थानकांमधून आणि यार्डांमधून सुरक्षितपणे मार्ग मोकळा करुन दिला जातो.

सध्या ट्रेन्ससाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रो-मेकॅनिकल इंटरलॉकिंगसारखी आधुनिक सिग्नलिंग सिस्टीम वापरता आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ही आधुनिक यंत्रणा असून पारंपारिक म्हणजेच मानवी सहभागाने करण्यात येणाऱ्या इंटरलॉकिंगपेक्षा ही अधिक सुरक्षित मानली जाते. (Latest Marathi News)

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये इंटरलॉकिंग नेमकं कुठे आणि कसं करायचं हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून निश्चित केलं जातं. ही एक प्रोसेस बेस सिस्टीम आहे. मात्र यामध्ये फेरफार करणं शक्य आहे.

Odisha Train Accident : रेल्वे अपघाताचे असलेले कारण 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' नेमकं आहे तरी काय?
Odisha Train Accident : मालगाडीमध्ये लोहखनिज असल्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली; रेल्वे बोर्डाची पत्रकार परिषद

इंटरलॉकिंग म्हणजे काय?

रेल्वे स्थानकाजवळ अनेक रेल्वे लाइन्स म्हणजेच मार्गिका असतात. या मार्गिका एकमेकांना वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये जोडल्या जातात. यासाठी काही ठराविक पॉइण्ट्स निश्चित केलेले असतात. या पॉण्ट्सवरुन मार्गिका निश्चित केल्या जातात तिथे एका मोटरच्या आधारे रुळांची दिशा बदलली जाते.(Latest Marathi News)

तर रेल्वे स्थानकांवरील सिल्गनलच्या माध्यमातून लोको पायलेटला ट्रेन स्थानकात आणण्यासंदर्भातील परवानगी दिली जाते किंवा नाकारली जाते. ट्रॅक लॉकिंग आणि सिग्नल्स या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न होऊन काम करतात.

म्हणजेच ट्रॅकची लॉकिंग केल्यावर ट्रेन कोणत्या मार्गाने जाणार हे निश्चित झाल्यानंतर त्याच मार्गावरील सिग्नल या ट्रेनला दिले जातात. या संपूर्ण यंत्रणेला सिग्नल इंटरलॉकिंग असं म्हणतात. सिग्नल इंटरलॉकिंगच्या माध्यमातून ट्रेन सुरक्षित मार्गाने प्रवास करेल हे सुनिश्चित केलं जातं.(Latest Marathi News)

Odisha Train Accident : रेल्वे अपघाताचे असलेले कारण 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' नेमकं आहे तरी काय?
Odisha Train Accident : २८८ मृत्यू तर ११०० जखमी; समोर आलं भीषण अपघाताचे कारण, रेल्वेमंत्री म्हणाले...

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सकाळी बालासोर येथे पोहोचून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()