Budget 2023 : अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय महत्वाचं?

Budget 2023
Budget 2023
Updated on

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ च्या निवडणुकीपूर्वी आज मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन यांनी कर कपातीसह अनेक मोठ्या घोषणा केल्या. आता ७ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. एवढेच नाही तर निर्मला सीतारामन यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली. महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. 

याशिवाय शेतकरी, तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प कसा असेल. निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय पातळीवर मोठ्या घोषणा केल्या. या घोषणांचा महाराष्ट्रावर काय परिणावर होणार, या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले हे समजून घेऊया.

शेतकऱ्यांसाठी काय?

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, शेतीला चालना देण्यासाठी कृषी स्टार्टअप्सची स्थापना केली जाईल, ज्यासाठी तरुणांना प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी कृषी निधी तयार करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि परवडणारे उपाय शोधण्यात मदत होईल. आधुनिक तंत्राचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळू शकेल. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय लक्षात घेऊन शेतीचे बजेट २० लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर स्वच्छ वनस्पती कार्यक्रमाद्वारे रोगमुक्त, दर्जेदार लागवड साहित्य देण्यासाठी २,२०० कोटी रुपये खर्च केले जातील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Budget 2023
Budget 2023 : लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरावर होणार परिणाम!

अ‍ॅग्रीकल्चर क्रेडिट कार्ड

सरकारने अ‍ॅग्रीकल्चर क्रेडिट कार्ड (KCC) 20 लाख कोटींनी वाढवण्याची घोषणा केली. गेल्या वर्षी तो १८.५. लाख कोटी रुपये होता. याशिवाय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खते, बियाणे ते मार्केट आणि स्टार्टअप्सपर्यंतची माहिती मिळू शकणार आहे. अ‍ॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंडाच्या माध्यमातून गावातील तरुणांना स्टार्टअप सुरू करण्याची संधी मिळेल. तसेच मत्स व्यवसाय विकासासाठी ६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

Budget 2023
Budget 2023: "आता अर्थमंत्र्यांचीही गरज नाही"; ChatGPTचं उत्तर वाचून तुम्हीही हेच म्हणाल!

नवीन क्रेडिट हमी योजना

देशात ६ कोटींहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग आणि ८४ हजारांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. त्यांच्यासाठी नवीन क्रेडिट हमी योजना १ एप्रिल २०२३ पासून लागू होईल. यामध्ये लघु आणि मध्यम उद्योगांना हमीशिवाय २ लाख कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. तसेच पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान पॅकेज लाँच केले जाईल, जे एमएसएमईला उत्पादन वाढविण्यात आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास मदत करेल.

Budget 2023
Union Budget : निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकार 'या' राज्यावर मेहरबान; अर्थसंकल्पात 'इतक्या' कोटींची तरतूद

शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती

तसेच पुढील ३ वर्षात देशातील ७४० एकलव्य शाळांमध्ये ३८,८०० शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. या शाळांमध्ये साडेतीन लाख आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या निवासी शाळांना मदत करते. याचा महाराष्ट्रीत तरुणांना फायदा होणार आहे. 

Budget 2023
Budget 2023 : बाकी सगळं ठीक पण अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना कुठे फटका बसलाय, जाणून घ्या

घराचे स्वप्न पूर्ण होणार

प्रत्येक घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने पंतप्रधान हाऊसिंगचा खर्च ७९,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे.  पंतप्रधानमहाऊसिंग खर्चात ६७% वाढ झाली आहे.

ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना बचत योजनांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा देण्यात आला आहे. सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ची कमाल ठेव मर्यादा ३० लाख रुपये केली आहे. जी पूर्वी १५ लाख रुपये होती. म्हणजे आता ज्येष्ठ नागरिक त्यांच्या ठेवी दुप्पट करू शकतात. या योजनेअंतर्गत सरकार ८% व्याज देते. 

Budget 2023
Budget 2023 : वार्षिक उत्पन्न 5 ते 15 लाख रुपये असेल, तर जाणून घ्या आता किती कर भरावा लागेल

१५७ नवीन नर्सिंग महाविद्यालये

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की २०१४ नंतर स्थापन झालेल्या विद्यमान १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने १५७ नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जातील. पीएमपीबीटीजी डेव्हलपमेंट मिशन विशेषत: आदिवासी गटांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू केले जाईल, जेणेकरून पीबीटीजी वसाहती मूलभूत सुविधांनी सुसज्ज होऊ शकतील. पुढील ३ वर्षांत ही योजना लागू करण्यासाठी १५,००० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील.

Budget 2023
Union Budget 2023: बजेट गरिबांच स्वप्न पुर्ण करणार; PM मोदींनी व्यक्त केला विश्वास

पायाभूत सुविधांवरील खर्चात ३३ टक्क्यांनी वाढ

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवरील खर्च ३३ टक्क्यांनी वाढवून १० लाख रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) ३.३ टक्के वाटा आहे.

महिला सन्मान बचत योजना

अर्थसंकल्पात महिलांसाठी देखील मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने महिलांसाठी विशेष योजना आणली आहे. या योजनेला महिला सन्मान बचत योजना, असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना ७.५ टक्के व्याज देणार आहे.

Budget 2023
Tax Regime : नवी की जुनी; कोणती करप्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.