जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे (Shinzo Abe) यांची एका सार्वजिनक सभेदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या घटनेने संपुर्ण जगभरात खळबळ उडाली. अबे यांचे भारतासोबत सलोख्याचे संबंध होते. भारताचे ते शुभचिंतक आणि मित्र म्हणून ओळखले जायचे. अबे यांच्याप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी आज देशात एक दिवशीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. पण तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रीय दुखवटा म्हणजे नेमकं काय? तो कोणासाठी व का जाहीर केला जातो? आज आम्ही तुम्हाला या संदर्भात समजून सांगणार आहोत. (national mourning)
राष्ट्रीय दुखवटा म्हणजे नेमकं काय?
राष्ट्रीय दुखवटा म्हणजे एखाद्या उल्लेखनीय व्यक्तीच्या निधनानंतर त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यक्त केलेली भावना.
देशाच्या प्रमुख संविधानिक पदांवर काम करीत असलेल्या किंवा समाजात आणि देशाप्रती उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो. या दरम्यान राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी वेळोवेळी निर्णय घेतात.
राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यावर राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो. राष्ट्रध्वज किती दिवस या स्थितीत राहील याचा निर्णय फक्त राष्ट्रपती घेतात, सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते, शासकीय सन्मा तिरंग्यात गुंडाळण्यात येते. आणि अंत्यसंस्कारावेळी बंदुकांची सलामी देण्यात येते. यासंदर्भातील सर्व निर्णय केंद्र पातळीवर केंद्रीय गृहमंत्रालय जारी करतात. राज्यस्तरावर संबिधित निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून घेतले जातात.
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतरत्न नेल्सन मंडेला, द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी, देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर अशा अनेक दिग्गजांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा साजरा केला गेलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.