Mission Divyastra: भारताच्या 'दिव्यास्त्र'ची यशस्वी चाचणी; PM मोदींनी ट्विट करत दिली माहिती

पंतप्रधानांनी यासाठी DRDO च्या शास्त्रज्ञांचं अभिनंदनही केलं आहे.
Agni-5 Missile
Agni-5 MissileEsakal
Updated on

नवी दिल्ली : भारताच्या अग्नि ५ या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी अर्थात 'मिशन दिव्यास्त्र'ची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून ते मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकलद्वारे (MIRV) प्रक्षेपित करण्यात आलं आहे. यासाठी पंतप्रधानांनी ट्विट करत DRDOच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदनही केलं आहे. (what is mission divyastra agni 5 missile first flight test successful drdo pm modi tweets marathi news)

सन २०२२ मध्ये भारताच्या सर्वाधिक शक्तीशाली अग्नि ५ या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यावेळी या क्षेपणास्त्रानं ५५०० किमी अंतरावरील टार्गेट उद्ध्वस्त केलं होतं. या मिसाईलला डीआरडीओ आणि भारत डायनेमिक्स लिमिटेडनं संयुक्तरित्या बनवलं आहे. भारताच्या या क्षेपणास्त्राची चीनसह इतर देशांना भीती आहे कारण हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून त्याच्या रेंजमध्ये हे देश येतात. (Latest Marathi News)

Agni-5 Missile
CAA Implementation: देशभरात आजपासून CAA लागू; केंद्रानं काढली अधिसूचना

अग्नि-५ क्षेपणास्त्राची ही आहे खासियत

अग्नी ५ क्षेपणास्त्राचं वजन ५० हजार किलो असून १७.५ मीटर इतकी याची लांबी आहे. त्याचा व्यास २ मीटर म्हणजेच ६.७ फूट असून त्याच्यावर १५०० किग्रँ वजनाचे अण्वस्त्र लावता येऊ शकतात. या क्षेपणास्त्रात तीन स्टेजचे रॉकेट बूस्टर आहेत, जे घन इंधनावर चालतात. याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा २४ टक्के जास्त आहे. म्हणजेच एका सेकंदाच ८.१६ किमीपर्यंत अंतर कापतं. (Latest Maharashtra News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.