सोशल मीडियावर बरेच ट्रेंड सुरू असतात जे युजर्सचे लक्ष खेचून घेतात. त्यात सर्वसामान्य जनता ते सेलिब्रिटींचाही समावेश असतो. ट्विटरवर असाच एक ट्रेंड सध्या बघायला मिळतोय. one word tweet trend या हॅशटॅगखाली हा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेण्डमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, सचीन तेंडुलकर आणि नासा , आयसीसी यांसारख्या जगप्रसिद्ध संस्थाही सहभागी झाल्या आहेत. (One Word Tweet : sachin tendulkar and nasa following it)
One Word Tweets Trend या ट्रेण्डखली भरतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरयांनी ट्विट केलेला शब्द आहे 'क्रिकेट'. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट केलेला शब्द आहे 'डेमोक्रेसी'. ट्विटरवर हा ट्रेण्ड भलताच लोकप्रिय होऊ पाहतो आहे. आतापर्यंत अनेक नामवंत लोकांनीही या ट्रेण्डखाली ट्विट केले आहे. अमेरिकेची आंतराळ संशोधन संस्था NASAनेही 'universe' हा शब्द ट्विट केला आहे. ICC ने 'cricket' हा शब्द ट्विट करत या ट्रेण्डमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.
एकाच शब्दात ट्विट करण्याच्या या ट्रेंडमध्ये सामान्य युजर्सबरोबरच जगभऱ्यातील अनेक नेते, सेलिब्रिटी, खेळाडू आणि नामांकित लोकांचा समावेश आहे. मात्र हा ट्रेंड कसा सुरू झाला याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना आहे.
असा सुरू झाला 'वन वर्ड ट्विट ट्रेंड'
सांगितले जातेय की अमेरिकी ट्रेन सर्विसशी संबंधित एक कंपनी एमट्रॅकने सर्वात आधी शुक्रवारी रात्री एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये एवळ एकच शब्द होता 'ट्रेन' . हा एकच शब्द ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता. या ट्विटनंतर हा ट्रेंड सेट झाला आणि हळू हळू जो तो हा वन वर्ड ट्विट करू लागला.
अमेरिकेतून सुरू झालेला हा ट्रेंड आता जगभरात ट्रेंड होऊ लागलाय. अमेरिकेच्या नासाबरोबरच आता आयसीसी, गूगल मॅप्स देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.