Declaration was announced by Prime Minister Narendra Modi
नवी दिल्ली- अनेक दिवसांच्या तर्कवितर्कानंतर आणि सांशकतेनंतर 'नवी दिल्ली जी-२० लिडर्स परिषद' जाहीरनामा सर्वानुमते स्वीकारण्यात आला आहे. भारताच्या या यशानंतर अनेक नेते आणि अधिकऱ्यांनी याचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानव केंद्रीय जागतिकीकरणाला या ऐतिहासिक जाहीरनाम्यात स्थान देण्यात आले होते.
जाहीरनामा स्वीकारला गेल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी परिषदेत केली. त्यानंतर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. जी-२० मधील नेत्यांचे अभिनंदन करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 'एक्स'वर प्रतिक्रिया दिली आहे. जी-२० नेत्यांच्या परिषदेत नवी दिल्ली जाहीरनामा अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आलाय.
पंतप्रधान मोदी यांचा मानव केंद्रीत जागतिकीरणावर भर आहे. याचा जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्यात आला होता. ग्लोबल साऊथ दृष्टीकोन बाळगणाऱ्या भारताला जी-२० नेत्यांनी अनुमोदन दिले असल्याचं निर्मला सीतारमण म्हणाल्या. जी-२० परिषदेतील नेत्यांच्या मदतीसाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद असंही त्या म्हणाल्या आहेत.
जी-२० मधील भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. जाहीरनाम्याला स्वीकारले जाणे हे एतिहासिक आणि मार्गदर्शक आहे.विकास आणि भू-राजकीय मुद्द्यांवर १०० टक्के एकमत झाले आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु असताना भू-राजकीय ऐकी महत्त्वाची ठरणार असल्याचं ते म्हणाले.
जाहीरनाम्याला मिळालेली अनुमती पंतप्रधान मोदी यांचे जागतिक नेतृत्व दाखवणारी आहे. प्लॅनेट, पीपल, पीस आणि प्रोस्पेरिटीसाठी नेत्यांनी दाखवलेली ऐकी अर्थपूर्ण असल्याचं कांत म्हणाले. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी जाहीरनाम्याचा स्वीकार उत्साहवर्धक आणि आनंदोत्सव साजरा करण्यासारखा असल्याचं म्हटलं. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.