Sharad Pawar-Rahul Gandhi Meeting: शरद पवार व राहुल गांधी यांच्यात काय चर्चा झाली? जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात?

गेल्या मंगळवारी इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेत होता
 Sharad Pawar and Rahul Gandhi Meeting
Sharad Pawar and Rahul Gandhi Meeting
Updated on

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय आता जवळपास अंतिम टप्प्यात आला असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे.

गेल्या मंगळवारी इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेत होता. मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रमुख आहे. महाराष्ट्रात असलेल्या ४८ जागांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षात प्रामुख्याने जागावाटपाची स्थानिक पातळीवर चर्चा झाली आहे. आज शरद पवार व राहुल गांधी यांची भेट झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

एकाच गाडीतून प्रवास-

‘जंतरमंतर’वर ‘इंडिया’ आघाडीच्या घटकपक्षांचे निदर्शने झाल्यानंतर शरद पवार व राहुल गांधी दोघेही एकाच गाडीत बसून थेट शरद पवार यांच्या ६, जनपथ या निवासस्थानी गेले. तेथे या दोन नेत्यांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाली.

 Sharad Pawar and Rahul Gandhi Meeting
Bacchu Kadu: "आईची जात मुलांना लागली तर मोठा घोळ होईल"; बच्चू कडूंच्या विधानामुळं संभ्रम

तिढा असलेल्या जागांवर चर्चा-

जवळपास १० ते १२ जागांबाबत अद्यापही महाविकास आघाडीत एकमत झालेले नाही. यात हातकणंगले, कोल्हापूर या प्रमुख मतदारसंघांचा समावेश आहे. हा तिढा दिल्लीतून सोडविण्याचे ठरले होते. या जागांच्या वाटपाबाबत यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

‘इंडिया’ आघाडीत समन्वयाची भूमिका-

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांसोबत समन्वय साधण्याची भूमिका शरद पवार यांच्याकडे येण्याची शक्यता अधिक आहे. या आघाडीतील मुख्यमंत्री नितीश कुमार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधून ‘इंडिया’ आघाडी अधिक मजबूत करण्यामध्ये शरद पवार अधिक महत्त्वपूर्ण व विश्वासार्ह भूमिका बजावू शकतील. या संदर्भात सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

 Sharad Pawar and Rahul Gandhi Meeting
Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ठरले, मोदींचे स्वीकारले निमंत्रण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.