नवी दिल्ली- नेटप्लिक्सवर २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेली 'IC 814: द कंदाहार हायजॅक' सिरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. वेब सिरिजमध्ये दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक गैर-मुस्लिम नावे देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वेब सिरिजला बायकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी राजकारण देखील तापू लागलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, IC 814 या वेब सिरिजवरून नेटफ्लिक्स कंटेंट हेडना माहिती प्रसारण मंत्रालयाचे समन्स पाठवला आहे. IC814 या कंदाहार विमान हायजॅकप्रकरणी तयार करण्यात आलेल्या वेब सिरिजमधून नेटफ्लिक्सने दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप करण्यात येतोय. याच पार्श्वभूमीवर कंदाहार हायजॅक प्रकरण काय होतं हे आपण जाणून घेऊया.