Opinion Poll: यूपीत भाजप तर पंजाबमध्ये आप? पाच राज्यात कसं असेल चित्र?

Opinion Poll: यूपीत भाजप तर पंजाबमध्ये आप? पाच राज्यात कसं असेल चित्र?
Updated on

मुंबई: अवघ्या काही दिवसांवरच पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यात विधानसभा निवडणूकांसाठीचे पडघम वाजले आहेत. या राज्यात कसं चित्र असू शकतं, याबाबतचा सर्व्हे एबीपी न्यूज-सी व्होटरने (Opinion Poll) केला आहे. त्यांच्या या सर्व्हेमधून कशाप्रकारचं चित्र राहू शकतं याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचाच आढावा आपण घेणार आहोत... (Assembly Election 2022 Opinion Poll)

Opinion Poll: यूपीत भाजप तर पंजाबमध्ये आप? पाच राज्यात कसं असेल चित्र?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कोरोना पॉझिटिव्ह; ट्विटद्वारे माहिती

उत्तर प्रदेशमध्ये असं असेल चित्र?

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. 'सी व्होटर'च्या पोलनुसार यूपीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याची चिन्हे आहेत. भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 223 ते 225 जागा मिळण्याचा अंदाज सी-व्होटरने वर्तवला आहे. भाजप यूपीमध्ये सत्ता राखणार आहे, मात्र 90 जागांवर नुकसान होण्याची शक्यता सी व्होटरने वर्तवली आहे.

तर दुसरीकडे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्षाला 103 हून वाढून 145 ते 157 वर जाण्याचा अंदाज सी व्होटरने वर्तवला आहे. मायावतींचा बहुजन समाज पक्ष तिसऱ्या स्थानी तर काँग्रेस पक्ष चौथ्या स्थानी राहू शकतं, असा अंदाज सी व्होटरने वर्तवला आहे.

Opinion Poll: यूपीत भाजप तर पंजाबमध्ये आप? पाच राज्यात कसं असेल चित्र?
तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीए; पिकपॉईंट कधी असेल? राजेश टोपेंनी दिलं उत्तर

गोव्यात काय आहेत अंदाज?

गोव्यामध्ये चाळीस जागांवर विधानसभेची निवडणूक होणार आहे. या 40 जागापैंकी 19 ते 23 जागांवर भाजप निवडून येण्याची शक्यता आहे. तर गोव्यात नुकताच प्रवेश केलेल्या आम आदमी पक्षाला 5 ते 9 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस पक्षाला 4 ते 8 जागा मिळू शकतात. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीला 2 ते 6 जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना शून्य ते चार जागा मिळण्याचीही शक्यता सी व्होटरने वर्तवली आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा भाजप?

सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, मणिपूरमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. भाजप पक्ष 23 ते 27 जागा जिंकू शकतो, तर काँग्रेसला 22 ते 26 जागा मिळू शकतात. तर एनपीएफला 2 ते 6 जागा आणि इतरांच्या खात्यात 5 ते 9 जागा येऊ शकतात.

उत्तराखंडमध्ये अशी होईल लढत

उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. सी व्होटर सर्व्हेनुसार, उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांपैकी भाजप 31 ते 37 जागांवर राहू शकतो. तर काँग्रेसला 30 ते 36 मिळू शकतात. आम आदमी पार्टीला 2 ते 4 आणि इतरांच्या खात्यात 0 ते 1 जागा जाऊ शकतात.

पंजाबमध्ये भाजपचा होणार सुफडासाफ?

एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्व्हेनुसार, पंजाबमधील विधानसभा निवडणुकीतील जागांबाबत बोलायचं झालं तर आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळू शकतात, तर दुसरीकडे आम आदमी पार्टीला 52-58 जागा मिळू शकतात. त्याचवेळी अकाली दल 17 ते 23 जागांवर राहू शकतो. तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत युती करून निवडणुकीत उतरलेल्या भाजपला 1 ते 3 जागा मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.