नवी दिल्ली : नेत्यांना अनेक सभांना, कार्यक्रमांना हजेरी लावावी लागते त्यामुळे ते दिवसातून तीन-तीनवेळा कपडे बदलतात. पण, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे राहणीमान अतिशय साधे होते. त्यांच्या या स्वभावामुळे तीन दिवस एकच शर्ट घातल्याबद्दल पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना सुनावले होते. त्यांची आज पुण्यतिथी.
(Pranab Mukherjee Death Anniversary Special Article)
काँग्रेस सत्तेत असतानाची गोष्ट. प्रणब मुखर्जी सलग तीन दिवस एकच शर्ट घालून भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या समोर गेले. याबद्दल इंदिरा गांधी यांनी विचारणा केली असता प्रणबदांकडे कोणतेही उत्तर नव्हते असे, मुखर्जी यांचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार जयंत घोषाल यांनी हा किस्सा सांगितला आहे.
एका मोठ्या पक्षाचा नेता असुन देखील प्रणबजींचे कपड्यांच्या बाबतीत असे बेशिस्त राहणे इंदिराजींना खटकले होते. प्रणबजींनी जेव्हा हा किस्सा पत्नी शुभ्रा मुखर्जी यांना सांगितला तेव्हा त्यांनीही त्याबद्दल तक्रार केली. प्रणबजी कपड्यांच्या बाबतीत व्यवस्थित राहत नाहीत, असे त्यांचेही मत होते. ‘इंदिरा गांधी इन माय आइज’ या पुस्तकातही शुभ्रा मुखर्जी यांनी उल्लेख केला आहे. प्रणव मुखर्जी यांना केवळ राजकीयच नाही तर एक नेता म्हणून आपले वावरणे कसे असावे, याबद्दलही इंदिराजी सल्ले द्यायच्या असेही घोषाल यांनी सांगितले.
प्रणव मुखर्जींची भारतीय राजकारणातील एकंदर कारकीर्द जवळपास ४२ वर्षांची, त्यानंतरची पाच वर्षे ते भारताचे राष्ट्रपती होते. म्हणजे त्यांची कारकीर्द एकंदर ४७ वर्षांची होती. इतकी वर्षं एखादी व्यक्ती रादकारणात टिकून राहते, याचा अर्थ तितकीच महनीय, कर्तबगार असतेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.