PM मोदींची ‘मन की बात’; या मुद्द्यांवर करु शकतात संबोधित

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता (​PM Modis Mann ki Baat) रेडियो कार्यक्रम 'मन की बात'​च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. मन की बात कार्यक्रमाच्या 80 व्या एडिशनामार्फत मोदी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आजच्या मन की बात कार्यक्रमात नरेंद्र मोदी गणेशोत्सव, अफगाणिस्तानमधील सद्याची परिस्थिती, डेल्टा प्लस व्हेरियंट, कोरोनाबाधितांची संख्या आणि लसीकरण या विषयावर बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम एकण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी सतत जनतेशी संवाद साधत आहेत. आज ते पुन्हा देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गणेशोत्सव, कोरोना लस, डेल्टा प्लस व्हेरियंट, उद्योग, शेती आणि शेतकरी या विषयांवर बोलण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी
अमेरिकेने घेतला बदला; इसिसच्या तळांवर 'ड्रोन स्ट्राइक'

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम आकाशवाणीवरुन प्रसारित होत असतो. 'मन की बात' या २० मिनिटांच्या कार्यक्रमातून सरकारच्या महत्वाच्या कामांची माहिती दिली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातील दखलपात्र छोट्या-मोठ्या घटनांचा आढावा यात घेतला जातो. जनतेकडून विषय विचारले जातात, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात. 'मन की बात'च्या पहिल्या एपिसोडमध्ये (ऑक्टोबर २०१४) मोदींनी स्वच्छतेवर भाष्य केलं होतं. तर नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यघटनेवर चर्चा केली होती. आजपर्यंत या कार्यक्रमासाठी ६१,००० कल्पना जनतेनं दिल्या आहेत. देशातील सर्व प्रकारची प्रसारमाध्यमं या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करत असतात.

नरेंद्र मोदी
पाऊस पुन्हा सक्रीय होणार, राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()