Petrol Price : 'या' देशामुळे भारतात पेट्रोल स्वस्त होणार; केंद्रीय मंत्र्याने दिलं स्पष्टीकरण

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी बुधवारी इंधनाच्या दराबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. जगातला आपला एकमेव देश आहे, जिथे...
Petrol
Petrolesakal
Updated on

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी बुधवारी इंधनाच्या दराबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. जगातला आपला एकमेव देश आहे, जिथे इंधनाचे दर स्थिर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरददृष्टीमुळे हे शक्य झालं आहे.

मंत्री हरदीप सिंह पुढे म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतर आपणही इंधनाचे दर कमी करु शकतो. भारत व्हेनेझुएला येथून तेल खरेदी करणार आहे. पारादीपसह आमच्या अनेक रिफायनरी व्हेनेझुएला येथील जड तेलावर प्रक्रिया करु शकतात.

Petrol
Kerala High Court: पतीने संमतीविरुद्ध लैंगिक संबंध ठेवल्यास पत्नीला घटस्फोटाचा अधिकार; न्यायालयाचा मोठा निर्णय!

''सध्या आपण प्रत्येक दिवसाला पाच मिलियन बॅरल कच्च तेल वापरत आहोत आणि याची मागणी प्रत्येक दिवशी वाढत आहे. जर व्हेनेझुएलाचं तेल बाजारात आलं तर आम्ही त्याचं स्वागत करु.. भारताने यापूर्वी २०२० मध्ये व्हेनेझुएला येथून कच्चं तेल आयात केलं होतं. तेव्हा अमेरिकेने या देशावर दुय्यम निर्बंध लादले होते'' अशी आठवण मंत्र्यांनी करुन दिली.

दक्षिण अमेरिकन देश सुमारे ८ लाख ५० हजार बॅरल प्रतिदिन कच्च्या तेलाचं उत्पादन करतात. १ दशलक्ष्यांचं उद्दिष्ट लवकरच ते गाठणार आहेत. भारत हा जगातला सर्वात मोठा दुसरा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. त्यामुळे ऊर्जेच्या बाबतीत धोरणं सक्षम करण्यासाठी भारताने रणनीती सुरु केल्याचं दिसून येत आहे.

Petrol
China Bizarre : एक नव्हे, दोन्ही पाय पोहोचले होते थडग्यात; अन् सहा दिवसांनी 'ती' झाली जिवंत! चीनमधील अजब प्रकार

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुढे म्हणाले, आपण अशा अवस्थेत आहोत, जिथे आपल्याला ८० टक्के परदेशी तेलावर अवलंबून राहावं लागतं. कच्च्या तेलाची आयात बिल कमी करुन शुद्धीकरण प्रक्रिया वाढवणे; हे भारताचे उद्दिष्ट आहे. या गरजेपोटी भारताचे लक्ष व्हेनेझुएला देशावर केंद्रीत झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.