Ice-Cream Finger: माणसाचं बोट आढळलेली ती आईस्क्रिम कंपनी कोणती? कुठे झालं उत्पादन? धक्कादायक माहिती समोर

ice cream finger mumbai: उत्पादन थांबवण्यात आले आहे. शिवाय मार्केटमध्ये गेलेले उत्पादन देखील परत बोलावण्यात आले आहे.
ice cream finger
ice cream fingereSakal
Updated on

नवी दिल्ली- मुंबईमधील एका डॉक्टरला आईस्क्रिम खाताना त्यात माणसाचं कापलेलं पोट आढळलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. या घटनेचे गाझियाबाद कनेक्शन समोर आले आहे. आईस्क्रिम हे Yummo बँडचे आहे.

२६ वर्षाच्या ब्रेंडन फेराओ याने आपल्या बहिणीसाठी झेप्टो अॅपवरुन तीन Yummo Mango आईस्क्रिम ऑनलाईन ऑर्डर केले होते. जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा त्याला दोन मँगो फ्लेवर आणि एक बटरस्कॉच आईस्क्रिम मिळाले. बटरस्कॉच आईस्क्रिम खाताना त्याला त्यात काहीतरी कठीण आढळलं. त्याने ते हातानं काढून पाहिल्यास त्याला मानवाचं बोट आढळून आलं. यामुळे त्याला चांगलाच धक्का बसला.

ice cream finger
Icecream Headache : आईस्क्रीम खाल्ल्यावर डोकेदुखी होत असेल तर काय कराल ?

फेराओ याने आईस्क्रिम आणि मानवाचं बोट घेऊन मालाड पोलीस स्टेशन गाठलं अन् तेथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी माणसाचं बोट फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये पाठवलं आहे. फेराओने याप्रकरणी Yummo आईस्क्रिम कंपनीकडे तक्रार देखील केली आहे. कस्टमर केअरने त्याला सांगितलंय की, याप्रकरणी ते तपास करत आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आईस्क्रिमची मॅन्युफॅक्चरिंग डेट ११ मे २०२४ आहे आणि एक्झपायरी डेट १० मे २०२५ आहे. आईस्क्रिमचे उत्पादन लक्ष्मी आईस्क्रिम प्रायव्हेट लिमिटेड गाझीयाबाद येथे बनलं आहे. Yummo आईस्क्रिम ब्रँड विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ice cream finger
Mumbai Shocker: बापरे! आईसक्रिम कोनमध्ये सापडलं चक्क माणसाचं बोट; झेपटो अ‍ॅपवरुन केलं होतं ऑर्डर

Yummo कंपनीकडून याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आम्ही हे उत्पादन थर्ड पार्टीकडून घेतलं आहे. त्यांचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. शिवाय मार्केटमध्ये गेलेले उत्पादन देखील परत बोलावण्यात आले आहे. याप्रकरणी आम्ही तपास करत असून संबंधित प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आईस्क्रिम कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात आयपीसी कलम २७२ (उत्पादनामध्ये भेसळ करणे), कलम २७३ (धोकादायक खाद्य आणि पेय विक्री) आणि कलम ३३६ (दुसऱ्यांचे आयुष्य धोक्यात टाकणे) याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.