नवी दिल्ली- मंकीपॉक्स संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स विरोधी पहिल्या लसीला मंजुरी दिली आहे. Bavarian Nordic या कंपनीच्या लसीला ही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता मंकीपॉक्सचा धोका कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'रॉयटर्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
लस बवेरियन नॉर्डिक किंवा एमवीए-बीएन लस १८ वर्षांपुढील प्रौढांना देण्यात येणार आहे. या लसीला चार आठवड्यांच्या अंतराने २ असे इंजेक्शन दिले जाणार आहेत. WHO ने सांगितल्यानुसार, सदर लस मंकीपॉक्सपासून वाचण्यासाठी ७६ टक्के प्रभावी आहे. तर, दोन खुराक घेतले तर लस ८२ टक्के प्रभावी ठरेल.