नवी दिल्ली : क्रिकेटर सुरेश रैना याच्या काकांवर सन २०२० मध्ये हल्ला करणाऱ्या हल्लेखारांचा युपी पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचं वृत्त आहे. मुझफ्फरनगरमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. पीटीआयनं पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं याबाबत वृत्त दिलं आहे. (who attacked Suresh Raina uncle in 2020 gunned down by UP cops in Muzaffarnagar)
रैनाच्या काकांवर 2020 मध्ये झाला होता हल्ला
पठाणकोट येथील थरयाल गावात १९ आणि २० ऑगस्टच्या मध्यरात्री सुरेश रैनाचे व्यवसायानं कॉन्ट्रॅक्टर असलेले काका अशोक कुमार यांच्यासह त्यांच्या मुलावर काही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मुलगा कौशल याचा ३१ ऑगस्ट रोजी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.
दरम्यान, सप्टेंबर २०२० मध्ये पंजाब पोलिसांनी दावा केला होता की, त्यांनी या मर्डर मिस्ट्रीमागील कारण शोधलं असून तीन जणांना अटकही केली आहे. या घटनेनंतर सुरेश रैना यानं आयपीएलच्या स्पर्धा सुरु असताना त्यातून वैयक्तिक करणासाठी माघार घेतली होती. त्यानंतर पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना उद्देशून रैनानं सोशल मीडिवर पोस्ट केली होती. यामध्ये त्यानं म्हटलं होतं की, या गुन्हेगारांनी आणखी गुन्हे करु नयेत यासाठी त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.