वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या कोरोनामुळे झालेल्या रुग्णांचे मृत्यू मोजण्याच्या पद्धतीवर भारताने आक्षेप घेतल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ प्रमुख गुजरातला भेट देणार आहेत. WHO चे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Dr Tedros Ghebreyesus) हे सोमवारी गुजरातच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत.
यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घेब्रेयसस18 एप्रिलला राजकोटला पोहोचतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जामनगरमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. येथे ते WHO च्या ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन (GCTM) च्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहतील.
राजकोटचे जिल्हाधिकारी महेश बाबू यांनी रविवारी सांगितले की, GCTM ही पारंपारिक औषधांसाठी जगातील पहिली आणि एकमेव जागतिक आऊटपोस्ट असेल. ते म्हणाले की, गेब्रेयसस गुरुवारी गांधीनगरला जाणार आहेत. याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आयुष इंन्व्हेस्टमेंट आणि इनोव्हेशन शिखर परिषदेत होणार आहे.
मॉरिशसचे पंतप्रधानही देणार भेट
तर राजकोटचे महापौर प्रदिव दाव यांनी सांगितले की, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे देखील सोमवारी राजकोटला पोहोचणार आहेत. येथे त्यांचे विमानतळावर सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या सन्मानार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम तयार करण्यात आल्याचे डाव यांनी सांगितले. ठिकठिकाणी खास होर्डिंग्जही लावण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताने याबाबत सदस्य देशांशी आपली चिंता व्यक्त केली आहे. याबाबत WHO ला सहा पत्रेही लिहिली आहेत. खरं तर, नुकत्याच आलेल्या न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार भारत WHO ला कोरोनामुळे जगभरातील मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यापासून रोखत आहे. या रिपोर्टमध्ये भारतात कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांचा अधिकृत आकडा 5.20 लाख आहे. तर, WHO च्या अंदाजानुसार, या महामारीमुळे देशात 40 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या आकडेवारीवरून काँग्रेस पक्षाने केंद्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत.कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे मृत्यूची गणना करण्याच्या WHO च्या पद्धतीवर भारताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
भारत सरकार म्हणते की विशाल भौगोलिक आकार आणि मोठ्या लोकसंख्येच्या आपल्या देशात मृत्यूचा अंदाज लावण्यासाठी कोणतेही गणितीय मॉडेल वापरणे योग्य असू शकत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.