Stampede Hathras: आधी UP पोलीस मग प्रवचनकार... कोण आहेत स्वयंघोषित संत भोले बाबा?, ज्यांच्या सत्संगात मृतदेहांचे लागले ढीग 

stampede hathras uttar pradesh : भोले बाबा सांगतात त्यांच्या जीवनात गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेने हे शरीर त्याच भगवंताचे अंश आहे हे त्यांना कळले.
Who Is Bhole Baba Sakar Vishwa Hari
Who Is Bhole Baba Sakar Vishwa Hariesakal

Who Is Bhole Baba Sakar Vishwa Hari

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे स्वयंघोषित संत भोले बाबा यांच्या सत्संगादरम्यान घडलेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ६० लोकांचा मृत्यू झाला आहे. भोले बाबा, ज्यांचे खरे नाव श्रीकृष्ण शर्मा होते, हे आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या अनुयायांच्या मोठ्या संख्येमुळे त्यांच्या सत्संगात नेहमीच गर्दी होत असते. अशा परिस्थितीत या सत्संगाचे आयोजन करणारे हे भोले बाबा कोण आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सत्संगात हजारो लोक उपस्थित होते. सत्संग सुरू होताच, अनुयायांमध्ये पुढे जाण्याची चढाओढ सुरू झाली. भोले बाबा मूळचे कांशीराम नगर (कासगंज) येथील पटियाली गावचा रहिवासी आहेत. यापूर्वी ते उत्तर प्रदेश पोलिसात भरती झाला होते, परंतु 18 वर्षाच्या सेवेनंतर त्यांनी व्हीआरएस घेतली आणि त्यांच्याच गावात एका झोपडीत राहतात. उत्तर प्रदेश आणि जवळपासच्या राज्यांमध्ये फिरतात आणि लोकांना देवाच्या भक्तीचा धडा देतात.

भोले बाबा सांगतात  त्यांच्या जीवनात गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेने हे शरीर त्याच भगवंताचे अंश आहे हे त्यांना कळले.

यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन मानव कल्याणात घालवण्याचा निर्णय घेतला. संत भोले बाबा यांचा दावा आहे की ते स्वतः कुठेही जात नाहीत, तर भक्त त्यांना बोलावतात. त्यांनी सांगितले की भक्तांच्या विनंतीवर ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरून सत्संग करीत असतात.

Who Is Bhole Baba Sakar Vishwa Hari
Uddhav Thackeray: अब्दुल सत्तार अन् सुधीर मुनगंटीवार माफी मागणार का? ; अंबादास दानवेंचा बचाव करतांना उद्धव ठाकरेंचा सवाल

भोले बाबा यांचा दावा आहे की त्यांच्या भक्तांची आणि अनुयायांची संख्या लाखोंमध्ये आहे. प्रत्येक सत्संगात मोठ्या संख्येने अनुयायी येतात. काही वेळा एखाद्या सत्संगात त्यांच्या अनुयायांची संख्या ५० हजारापेक्षा जास्त होते. ते म्हणतात की ते नेहमी आपल्या अनुयायांना मानवतेच्या कल्याणाची शिकवण देतात आणि त्यांना मानवसेवा करून भगवंताशी जोडण्याची प्रेरणा देतात.

प्रशासनाची प्रतिक्रिया-

चेंगराचेंगरीची घटना घडल्यावर प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाने भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे ठरवले आहे.

दोन वर्षापूर्वी जेव्हा देशात कोरोनाची लाट आली होती, तेव्हा उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे मे २०२२ मध्ये सत्संगचे आयोजन केले होते. तेव्हा जिल्हा प्रशासनाने त्यावेळी केवळ ५० जणांना परवानगी दिली हेाती. मात्र कायदा मोडूत त्यांनी ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक जमले. त्यामुळे शहरातील व्यवस्था कोलमडून पडली हेाती. याप्रकरणी जिल्हा प्रशसनाने आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Who Is Bhole Baba Sakar Vishwa Hari
Stampede Hathras: हाथरस सत्संग समारंभात चेंगराचेंगरीत मृतांचा आकढा वाढला, 60 जणांचा मृत्यू...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com