Haldwani Violence: हल्दवानी हिंसाचाराचा सूत्रधार कोण? ज्याच्या बागेत मशीद होती त्या व्यक्तीचा शोध सुरू

Haldwani Violence: हल्दवानी हिंसाचार प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये अब्दुल मलिक हे नाव समोर आले आहे. अब्दुल मलिक हा या हिंसाचाराचा सूत्रधार असल्याचे मानले जात आहे.
Haldwani Violence
Haldwani ViolenceEsakal
Updated on

हल्दवानी हिंसाचार प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये अब्दुल मलिक हे नाव समोर आले आहे. अब्दुल मलिक हा या हिंसाचाराचा सूत्रधार असल्याचे मानले जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत 3 एफआयआर नोंदवले असून त्यात अब्दुल मलिकच्या नावाचा उल्लेख आहे. पोलिसांनी ज्या ठिकाणाहून अतिक्रमण हटवले आहे ती जागा अब्दुल मलिक याच्या नावावर आहे.(Latest Marathi News)

हल्दवानी हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये 16 जणांची नावे आहेत, तर 5000 लोक अज्ञात आहेत. आतापर्यंत पाच हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, तर सुमारे 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे ते हिंसाचाराच्या ठिकाणी होते की नाही याचा तपास केला जात आहे.

Haldwani Violence
Kalasa-Banduri Scheme : तब्बल 26.96 हेक्टर वनजमीन हस्तांतराचा प्रस्ताव फेटाळला; कर्नाटकाला मोठा दणका

अब्दुल मलिकचा शोध सुरू

आता एफआयआरमध्ये अब्दुल मलिकचे नाव आले आहे. तो हिंसाचाराचा सूत्रधार मानला जात आहे. ज्या ठिकाणी पोलिसांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे. त्याच्या नावावर आहे. आता पोलीस अब्दुल मलिक आणि त्यासह इतर सूत्रधारांचा शोध घेत आहेत. (Marathi Tajya Batmya)

स्थानिक गुप्तचरांनी याआधी केले होते सतर्क

स्थानिक गुप्तचर युनिटच्या अहवालानुसार, महिला ब्रिगेडला पुढे जाण्यासाठी इनपुट होते. अतिक्रमण पाडण्यासाठी महापालिकेचे पथक आले तर त्यावेळी महिलांना पुढे आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. या प्रकरणी स्थानिक गुप्तचरांनी हल्द्वानी प्रशासनाला 5 वेळा अलर्ट केले होते. अतिक्रमण हटवल्यास दंगली होण्याची भीती एलआययूने आपल्या गुप्तचर अहवालात व्यक्त केली होती.

Haldwani Violence
Ayodhya Ram Mandir : ‘रामोत्सव’निमित्त अयोध्येत कार्यक्रमांची धूम

यासोबतच कारवाई करण्यापूर्वी ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्याची सूचना केली होती, मात्र प्रशासनाने तसे काही केले नाही. गुप्तचर अहवालात सकाळी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याची सूचना करण्यात आली होती, मात्र प्रशासनाने दुपारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. LIU ने 31 जानेवारीला दोनदा अलर्ट केला. 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारीलाही दोनदा अलर्ट देण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये समाजवादी पक्षाच्या एका नेत्याचा भाऊ, दोन नगरसेवक, एक खाण व्यावसायिक आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. सध्या पोलिसांना अब्दुल मलिकवर सर्वाधिक संशय असून तो फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Haldwani Violence
Ayodhya Ram Mandir : ‘अयोध्ये’वरून शिवसेनेचे दोन गट आमनेसामने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.