Varanasi Loksabha Election Result 2024: सुरुवातीच्या कलांमध्ये मोदींना घाम फोडणारे अजय राय कोण? तीनवेळा राहिलेत भाजपचे आमदार

Who is Ajay Rai ?काँग्रेसच्या अजय राय यांनी जवळपास सहा हजार मतांनी आघाडी घेतली होती. अजय राय यांच्या आघाडीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
Ajay Rai narendra modi
Ajay Rai narendra modi
Updated on

नवी दिल्ली- वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर गेले होते. काँग्रेसच्या अजय राय यांनी जवळपास सहा हजार मतांनी आघाडी घेतली होती. तिसऱ्या राऊंडपर्यंत असाच कल होता. अजय राय यांच्या आघाडीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर अजय राय कोण आहेत हे आपण पाहूया.

अजय राय यांनी जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाच ते चर्चेत आले होते. अजय राय हे २०१२ पासून काँग्रेसचे सदस्य आहेत. ते उत्तर प्रदेशातून पाचवेळा आमदार राहिलेले आहेत. वाराणसीमधील स्थानिक बाहुबली नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते सध्या उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे.

राय यांनी सोयीनुसार अनेकवेळा पक्ष बदलला आहे. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द भाजपची विद्यार्थी संघटना एबीव्हीपीमधून सुरुवात केली होती. उत्तर प्रदेशातील कोलास्ला येथून ते तीन वेळेस आमदार राहिले आहेत. त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

Ajay Rai narendra modi
Maharashtra Lok Sabha Election Results: राज्यात भाजपचा धुव्वा तर काँग्रेसची लाट, वाचा लोकसभा निवकालाची प्रत्येक अपडेटट

भाजपकडून २००९ मध्ये लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. ते समाजवादी पार्टीकडून निवडणूक लढले पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर अपक्ष म्हणून कोलास्ताची विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. ते पुन्हा आमदार झाले होते. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने त्यांना संधी दिली होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. तिन फेऱ्यानंतर मोदी पुन्हा आघाडी घेताना दिसत आहेत. मागील वेळेस पंतप्रधान मोदी यांचा मोठ्या मताधिक्क्यांनी विजय झाला. तोच कित्ता यावेळी सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तूर्तात वाराणसी लोकसभा मतदारसंघात नेमका काय निकाल लागतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.