एनआयएने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. तपास यंत्रणेने अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएने 2022 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये अनमोल बिश्नोईच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
अनमोल बिश्नोई हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा सख्खा भाऊ आहे. स्नॅपचॅटच्या माध्यमातून तो बाबा सिद्दीकी यांच्या शूटर्सच्या संपर्कात असल्याचा आणि बाबा सिद्दीकी आणि झिशानचे फोटो शूटर्सना स्नॅपचॅटवर पाठवून कंत्राट दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.