Baba Siddiqui Murder Case Update: लॉरेन्स गँगने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की लॉरेन्स बिश्नोई देखील भाईजानच्या जवळच्या लोकांच्या जीवाचा शत्रू बनला आहे. तीनही गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटली आहे. अटक करण्यात आलेले शूटर्स लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. अवघ्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी त्याने बाबा सिद्दिकींच्या घराची रेकी केली होती आणि आता तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून खून केला.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडिया पोस्टद्वारे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते. या पोस्टमध्ये अनुज थापन यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. पण, कोण आहे हा अनुज थापन, ज्याचे नाव लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतले आहे.
अनुज थापनला बॉलिवूड स्टार सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अनुज थापनने मुंबई क्राईम ब्रँचच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अनुज थापन हा मूळचा पंजाबचा. यावर्षी 14 एप्रिल रोजी सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन जणांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी विकी गुप्ता (24) आणि सागर पाल (21) या दोघांना गुजरातमधून अटक केली.
पोलिसांनी सोनू कुमार चंदर बिश्नोई (37) आणि अनुज थापन (32) यांना पंजाबमधून शस्त्रे पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर न्यायालयाने विकी गुप्ता, सगल पाल आणि अनुज थापन यांना पोलीस कोठडी सुनावली, तिथे अनुज थापनने आत्महत्या केली. यानंतर बिश्नोई टोळीने अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सलमान खानच्या जवळचे असलेले बाबा सिद्दिकी यांची हत्या केली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून सलमानचा जो कोणी मित्र आहे तो लॉरेन्स गँगचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे म्हटले आहे. बाबा सिद्दीकी यांची सलमान खानसोबतची मैत्री सर्वश्रुत आहे. रमजानमध्ये इफ्तार पार्ट्यांमुळे ते नेहमीच चर्चेत होते. यामध्ये सलमान, शाहरुख खान सारखे बडे सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात लॉरेन्स गँगचे नाव समोर आल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणालाही घराबाहेर पडू दिले जात नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.