K Suresh: INDIA आघाडीचे लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार के सुरेश कोण? सर्वाधिक अनुभवी खासदार म्हणून ओळख

लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी मतदान होणार आहे. यामध्ये हे निश्चित होईल की, १८ व्या लोकसभेचा अध्यक्ष कोण असेल?
K Suresh
K Suresh

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर १८ व्या संसदेचं पहिलंच अधिवेशन कालपासून सुरु झालं. या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. पण यंदाच्या अध्यक्ष निवडणीचं वैशिष्ट म्हणजे यंदा भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षासाठी थेट निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपप्रणित एनडीएकडून ओम बिर्ला यांनी अर्ज केला आहे तर विरोधक असलेल्या इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी अर्ज दाखल केला आहे. (Who is K Suresh Lok Sabha Speaker candidate of INDIA Alliance who is most experienced MP)

K Suresh
Shiv Sena MP: शिवसेनेच्या खासदारानं शपथविधीवेळी घेतलं बाळासाहेबांचं नाव! पुन्हा घ्यायला लावली शपथ

भाजपनं काँग्रेसचे अध्यक्ष मल्ल्कार्जुन खर्गे यांच्याकडं ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. याला विरोधकांनी पाठिंबाही दिला होता. त्याबदल्यात लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना मिळावं अशी अट ठेवली होती पण याला एनडीएन नकार दिला. त्यामुळं आता विरोधक ही निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करत के. सुरेश यांना इंडिया आघाडीनं अर्जही भरायला सांगितलं आहे. पण या महत्वाच्या घटनात्मकपदासाठी विरोधकांनी संधी दिलेले के. सुरेश नेमके आहेत कोण? जाणून घेऊयात. लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी मतदान होणार आहे. यामध्ये हे निश्चित होईल की, १८ व्या लोकसभेचा अध्यक्ष कोण असेल?

K Suresh
नाशिक हळहळलं! शाळेत चक्कर येऊन पडल्यानं सहावीतील विद्यार्थीनीचा मृत्यू

कोण आहेत के सुरेश?

के. सुरेश हे काँग्रेसचे खासदार असून ८ वेळा ते संसदेवर निवडून आले आहेत. के. सुरेश हे काँग्रेसमधील एक दलित चेहरा आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते मावेलिक्कारा लोकसभा मतदारसंघातून सलग आठव्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी या मतदारसंघातून चार वेळा आणि तत्पूर्वी चार वेळा अदूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

के. सुरेश हे पहिल्यांदा १९८९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर २००९ मध्ये मावेलिक्कारा जागेवरुन सातत्यानं जिंकत आले आहेत. सन २००९ मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे.

K Suresh
Suryakanta Patil: नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का! सूर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

परिस्थिती अनुकूल नसतानाही जिंकली निवडणूक

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये के. सुरेश यांनी सीपीआयचे तरुण उमेदवार अरुण कुमार यांना १०,००० मतांनी हारवलं. हे राज्यात सर्वात कमी मताधिक्य होतं. हा तोच मतदारसंघ आहे जिथं सीपीआयएमच्या नेतृत्वातील डावी लोकशाही आघाडीचे (LDF) सर्व ७ विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत.

सुरुवातीला विरोधकांनी सर्वाधिक अनुभवी खासदार म्हणून के. सुरेश यांना १८ व्या लोकसभेसाठी प्रो टेम स्पीकर बनवण्यास विरोध केला होता. पण आता सर्वाधिक अनुभवी खासदार म्हणूनच त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी निवडण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com