प्रियकराचा बदला घेण्यासाठी एअरलाइन क्रू मेंबरला संपवलं; लॉरेन्स बिश्नोईसोबत वैर, काजल खत्री नक्की आहे तरी कोण?

Kajal Khatri News: मोस्ट वॉन्टेड लेडी डॉन काजल खत्रीला दिल्ली क्राईम ब्रँचने नोएडा येथे एअरलाइन क्रू मेंबरच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. यावर्षी जानेवारीत त्याने नोएडा येथील एअरलाइन्समध्ये काम करणाऱ्या सूरजमान या क्रू मेंबरची शूटर पाठवून हत्या केली होती. काजल खत्रीवर पोलिसांनी २५ हजारांचे बक्षीस ठेवले होते.
Kajal Khatri
Kajal Khatri ESakal
Updated on

दिल्ली एनसीआर येथील खळबळजनक हत्याकांडात वॉन्टेड लेडी डॉनला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यूपी पोलिसांनी या वॉन्टेड व्यक्तीवर 25 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. आरोपी महिला ही एका कुख्यात गुंडाची प्रेयसी बनलेली पत्नी होती. ती सध्या तुरुंगात आहे. काजल खत्री असे आरोपीचे नाव असून ती हरियाणातील कुंडली सोनीपत येथील रहिवासी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.