Laddu Mutya Swami : हाताने फॅन थांबवून प्रसाद देणारा लाडू मुत्या बाबा आहे तरी कोण?

Laddu Mutya News : त्यांच्या 'फॅन'च्या चमत्कारिक कृत्याचे सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ, रिल्स व्हायरल होताना दिसत आहेत.
Laddu Mutya News
Laddu Mutya Newsesakal
Updated on
Summary

लाडू मुत्या बाबा म्हणाले, ''समाजात प्रत्येकाने चांगले काम केले, तरच जीवन सार्थक होते. जेव्हा प्रत्येकजण आनंदी असतो, तेव्हा आयुष्य सुंदर असते.''

Laddu Mutya News : कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यामधील (Bagalkot Karnataka) लाडू मुत्या बाबा (Laddu Mutya Baba) सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगवर आहेत. त्यांच्या 'फॅन'च्या चमत्कारिक कृत्याने भाविक त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी रांगा लावताना दिसत आहेत. ते 'फॅन बाबा' (Fan Baba) म्हणूनही आता प्रसिध्दीच्या झोतात आले आहेत.

त्यांच्या 'फॅन'च्या चमत्कारिक कृत्याचे सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ, रिल्स व्हायरल होताना दिसत आहेत. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाविकाच्या घरातील जोरात सुरु असलेला फॅन हाताने थांबवून भाविकाला आशीर्वाद दिला होता. त्यानंतर या बाबाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली.

Laddu Mutya News
राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारण्यात येणार; आयुर्मान असणार 100 वर्षे

लाडू मुत्या बाबा आहे तरी कोण?

पण, हा बाबा आहे तरी कोण? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला असेल. तर, लाडू मुत्या बाबा हे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील आहेत. 'फॅन'च्या चमत्कारिक कृत्याबरोबरच ते प्रवचन देण्यातही माहीर आहेत.

Laddu Mutya Baba News
Laddu Mutya Baba Newsesakal

दरम्यानच्या काळात यालाबुर्गा (Yalaburga) तालुक्यातील संगनहळा गावातील श्री संगमेश्वरा जत्रोत्सव मंदिरात जाऊन त्यांनी देवाचं दर्शन घेतलं आणि तिथं प्रवचनही दिलं. लाडू मुत्या बाबा म्हणाले, समाजात प्रत्येकाने चांगले काम केले, तरच जीवन सार्थक होते. जेव्हा प्रत्येकजण आनंदी असतो, तेव्हा आयुष्य सुंदर असते. आपण इतरांचे भले केले पाहिजे, कितीही कठीण प्रसंग आले तरी आत्मविश्वासाने त्याला सामोरे जाण्याचे आणि पुढे जाण्याचे धैर्य आपण विकसित केले पाहिजे. कधीही वाईट कामात गुंतू नका. चालीरिती जाणून योग्य मार्गावर चालले पाहिजे. गुरू आणि ज्येष्ठांचा आदर करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.